Marathi News> विश्व
Advertisement

जगातील सर्वात मोठ्या प्राण्याचा पुरावा सापडला, 'या' अवशेषामुळे खुलासा

मोठी गोष्ट म्हणजे अलीकडेच शास्त्रज्ञांना या प्राण्याशी संबंधित एक गोष्ट सापडली आहे.

जगातील सर्वात मोठ्या प्राण्याचा पुरावा सापडला, 'या' अवशेषामुळे खुलासा

मुंबई : पृथ्वीच्या निर्मीतीनंतर अशा वेगवेगळ्या प्राणांच्या प्रजातींचा जन्म झाला. त्यातील काही प्रजाती कायमच्या नाश पावल्या आहेत. तर काही प्रजातींमध्ये काही बदल झाले आहे. यांमधील डायनासोर, मॅमथ यासारखे अनेक नामशेष प्राणी अजूनही लोकांना आश्चर्यचकित करतात. पण आता शास्त्रज्ञांना अशा एका जीवा विषयी माहिती मिळाली आहे, जी या सर्वांपेक्षा खूप जुनी आहे आणि शास्त्रज्ञ त्याला जगातील सर्वात मोठा जीव म्हणत आहेत.

मोठी गोष्ट म्हणजे अलीकडेच शास्त्रज्ञांना या प्राण्याशी संबंधित एक गोष्ट सापडली आहे. ती म्हणजे या प्राण्याचा दात. प्राण्याच्या या दातावरुन तुम्ही अंदाजा लावू शकता की, हा प्राणी किती मोठा असावा.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांना स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतावर ९ हजार फूट उंचीवर एक धक्कादायक गोष्ट सापडली आहे. अहवालानुसार, येथे एका प्राण्याचे दात सापडले आहेत, जो 9 कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाले आहेत. म्हणजेच हा प्राणी त्याआधीही या पृथ्वीवर वास्तव्य करत असावा. तथापि, शास्त्रज्ञांना या जीवाबद्दल फारच कमी माहिती आहे.

प्राण्याचे नाव काय आहे?

लाइव्ह सायन्स वेबसाइटने म्हटले आहे की, या प्राण्याचे नाव इचथियोसॉर आहे, म्हणजे हा पाण्यात राहणारा मासा, जो ट्रायसिक काळात म्हणजेच सुमारे 200 दशलक्ष वर्षांपूर्वी वास्तव्य करत असावा.

हा एक मासा मांस खाणाऱ्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गात होता. माशाच्या आकारामुळे, त्याचा पोहण्याचा वेग ताशी 35 किलोमीटर असावा. एवढेच नाही तर या प्राण्याची लांबी जगातील सर्वात मोठ्या ब्लू व्हेलपेक्षा कितीतरी पटीने जास्त असावी असे सांगण्यात येत आहे.

प्राण्याचा आकार किती असेल?

28 एप्रिल रोजी जर्नल ऑफ व्हर्टेब्रेट पॅलिओन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात शास्त्रज्ञांनी हे सर्व खुलासे केले आहेत. जो दात सापडला आहे तो अर्धा तुटलेला आहे, असा त्यांचा दावा आहे, पण त्या दातावरून त्या प्राण्याचा आकार किती मोठा असावा याचा अंदाज लावता येतो.

याआधी, इचथियोसॉर ज्याचा सर्वात मोठा दात सापडला होता, त्याच्या जीवाचा पूर्ण आकार 50 फुटांपर्यंत असायचा. मात्र हा दात पाहून तो प्राणी आणखी मोठा असेल असा दावा केला जात आहे.

या दाताचा आकार 4 इंच लांब असून त्याचा वरचा भाग तुटलेला आहे, तर दात मुळापासून 2.3 इंच रुंद आहे.

Read More