Marathi News> विश्व
Advertisement

World No Tobacco Day 2021: दारुच्या एका बाटलीत सिगारेट किती? तुम्हाला धक्का बसेल

हे संशोधन काही काळापूर्वी यूके मध्ये घेण्यात आले होते आणि ब्रिटनच्या बायोमेड सेंट्रल (बीएमसी) एजन्सीने हे संशोधन केले होते. 

World No Tobacco Day 2021: दारुच्या एका बाटलीत सिगारेट किती? तुम्हाला धक्का बसेल

लंडन : आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि या निमित्ताने सर्वत्र सिगारेट ओढणाऱ्या लोकांना वेगवेगळे सल्ला दिले जात आहेत. याच विषयावर आम्ही सुद्धा तुम्हाला एक सल्ला देणार आहेत. हा सल्ला एका संशोधनावर आधारित आहे. या संशोधनानुसार जर आपण आठवड्यात 750 मिली अल्कोहोल प्यालात तर, कर्करोग होण्याचे तितकेच चान्स आहे, जितका एका आठवड्यात महिलांनी 10 सिगारेट आणि पुरुषांनी 5 सिगारेट प्यायलावर होतो.

हे संशोधन काही काळापूर्वी यूके मध्ये घेण्यात आले होते आणि ब्रिटनच्या बायोमेड सेंट्रल (बीएमसी) एजन्सीने हे संशोधन केले होते. ब्रिटनमधील सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुरुष आणि स्त्रिया आठवड्यातून केवळ 14 युनिट अल्कोहोल पिऊ शकतात. या युनिटला 6 बिअर आणि 6 ग्लास वाइनच्या बरोबर असल्याचे म्हटले जाते.

संशोधकांच्या मते, जे लोकं कमी अल्कोहोल पितात अशा लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी जागृत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तज्ञांनी असेही म्हटले आहे की, बहुतेक अल्कोहोल पिणाऱ्यालोकांसाठी, सिगारेट ओढणे अल्कोहोलपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते आणि यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हे धोके कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सिगारेट पूर्णपणे सोडून देणे.

स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो

संशोधनानुसार असे सांगितले जाते की, जेव्हा आपल्या आरोग्याला धोका असतो तेव्हा अल्कोहोल घेण्याचे कोणतेही सुरक्षित प्रमाण नसते. त्यांनी असेही सांगितले की आम्ही असे ही सांगू शकत नाही की, कमी पिणाऱ्या लोकांना कर्करोग होत नाही म्हाणून.  

बीएमसीच्या पब्लिक हेल्थमधील संशोधकांनी असे म्हटले आहे की, जर आठवड्यात एक हजार पुरुष आणि एक हजार महिला एक बाटली अल्कोहोल पित असतील तर त्यातील सुमारे 10 पुरुष आणि 14 महिलांना कर्करोगाचा धोका असतो.

अल्कोहोल प्यायल्याने महिलांमध्ये स्तन आणि पुरुषांमध्ये यकृत आणि पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे.

प्रभाव पूर्णपणे थांबविणे कठीण

या व्यतिरिक्त या पथकाने तंबाखू आणि अल्कोहोलच्या कॅन्सर रुग्णांच्या डेटावर संशोधन केले. ब्रेस्ट कॅन्सरवर संशोधन करणारे डॉ. मिनोक शोमेकर म्हणाले की, संशोधनातून काही अश्चर्यकारक गोष्टी' समोर आल्या आहेत. परंतु स्पष्ट असे काही नाही.

कर्करोग संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. शोमेकर म्हणाले की, कर्करोगाच्या जोखमीचे चित्र अत्यंत गुंतागुंतीचे आणि उपद्रवदायक आहे, म्हणून हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, नवीन अभ्यास अनेक गृहितकांवर आधारित आहे. उदाहरणे देताना ते म्हणाले की, अल्कोहोल आणि सिगारेटच्या धूम्रपानानंतर होणारे दुष्परिणाम पूर्णपणे थांबविणे कठीण आहे.

हे संशोधन केवळ कर्करोगाबद्दलच सांगत आहे, इतर आजारांबद्दल नाही. धूम्रपान करणार्‍यांमध्ये हृदय आणि फुफ्फुसांचे आजार अधिक आढळतात. 2004 मधील डेटा या संशोधनात वापरण्यात आला होता आणि कर्करोगाच्या इतर कारणांचा त्यात समावेश नाही. वय, कौटुंबिक जनुके, अन्न आणि जीवनशैली देखील कर्करोगाची कारणे असू शकतात.

सिगारेटचे धूम्रपान करणे अधिक धोकादायक आहे

नॉटिंगम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जॉन ब्रिटन यांच्या म्हणण्यानुसार, धोक्यांची तुलना करून लोक सिगारेट आणि अल्कोहोलची निवड करतात, असं वाटत नाही.

प्रोफेसर ब्रिटन हे यूके सेंटर फॉर टोबॅको अँड अल्कोहोल स्टडीजचे संचालक आहेत. ते म्हणतात, या संशोधनात असे दिसून आले आहे की, अल्कोहोलपेक्षा सिगारेट कर्क रोगासाठी अधिक धोकादायक आहे. आणि जर इतर रोगांबद्दल बोलायचे झाले तर, सिगारेट हे मद्यपानापेक्षा जास्त धोकादायक आहे.

Read More