Marathi News> विश्व
Advertisement

World Snake Day 2022: जगातील 10 सर्वात विषारी साप तुम्हाला माहितीय का?

विषाचा एक थेंबही मृत्यूचं कारण ठरू शकतो, जाणून घ्या जगातील टॉप 10 विषारी सापांबद्दल

World Snake Day 2022: जगातील 10 सर्वात विषारी साप तुम्हाला माहितीय का?

मुंबई : वर्ल्ड स्नेक डेच्या निमित्ताने आज जगभरातील सर्वात विषारी सापांबद्दल जाणून घेऊया. हे साप चावल्यानंतर अर्ध्या तासाच्या आता अँटीव्हेनम किंवा अँटीडोट मिळालं नाही तर मृत्यू निश्चित असतो. कोणते 10 विषारी साप आहेत जाणून घेऊया.

इनलँड ताइपन- हा सर्वात विषारी साप आहे. त्याचं एक थेंब विष म्हणजे थेट मृत्यूच. हल्ला करण्याआधी हा साप आपलं शरीर वेगानं जवळ घेतो आणि त्यानंतर पूर्ण ताकदीने हल्ला करतो. हा साप चावला तर एका तासाच माणसाचा मृत्यू निश्चित आहे. हा साप ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. 100 लोकांचा जीव जाऊ शकतो एवढी त्याची क्षमता आहे. 

ईस्टर्न ब्रॉउन स्नेक- ईस्टर्न ब्राउन स्नेक हा जगातील सर्वात जीवघेण्या सापांपैकी एक मानला जातो. हा जगातील दुसरा सर्वात विषारी साप मानला जातो. हाही ऑस्ट्रेलियात आढळतो. त्याची लांबी साधारण 7 फूट असते. त्यांच्या दंशानंतर मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होतो. 

ब्लॅक मांबा (Black Mamba)- ब्लॅक मांबा हा आफ्रिकेतील सर्वात विषारी साप मानला जातो. त्याचे विष कार्डियोटॉक्सिक आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. त्याच्या विषाचा एक थेंबही माणसाला मारण्यासाठी पुरेसा आहे. अर्ध्या तासात अँटीव्हेनम सापडले नाही तर जीव वाचवणे कठीण होते. त्याचे विष मज्जासंस्था आणि स्नायूंसाठी हानीकारक आहे. या सापाची लांबी 6 ते 8 फूट असून तो ताशी 30 किलोमीटर वेगाने धावतो.

कॉमन डेथ एडर (Common Death Adder)- कॉमन डेथ अॅडर हा देखील जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हे वाइपरसारखे दिसतात. डेथ अॅडर सापाचे डोके रुंद, चपटे आणि त्रिकोणी तसेच लाल, तपकिरी आणि काळ्या रंगाच्या पट्ट्यांनी भरलेलं असतं. या सापाची लांबी जास्त नाही. ते जेमतेम 1 मीटरचे असतात.

बेल्चर्सचा सी- बेल्चर्सचा सागरी साप हा जगातील सर्वात विषारी सागरी साप असल्याचे म्हटले जाते. या सापाच्या चाव्यामुळे 30 मिनिटांत मृत्यू होऊ शकतो. हे साप आकाराने लहान असून ते पिवळ्या रंगाचे केस आणि हिरव्या रंगाचे क्रॉसबँड असलेले दिसतात. हा विषारी साप मुख्यतः हिंदी महासागर, थायलंडचे आखात, न्यू गिनी आणि इंडोनेशियाच्या किनार्‍याभोवती आढळतो. 

बँडेड क्रेट- बँडेड क्रेट ही भारतातील सर्वात विषारी सापांची प्रजाती आहे. तो दिसायला जेवढा चमकदार तेवढाच घातक आहे. हे फार क्वचितच चावतात. बँडेड क्रेटचे विष न्यूरोटॉक्सिक असते. त्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो. हे साप बहुतेक रात्री बाहेर पडतात. त्यांचे दात लहान असतात. कधीकधी हा साप चावलेला देखील समजत नाही.

फिलीपीन कोब्रा- हा कोब्रा प्रजातीचा साप आहे, जो बहुतेक फिलीपिन्स आणि आसपासच्या देशांमध्ये आढळतो. कोब्रा सापापेक्षा जास्त विषारी असतो. हे साप 3 मीटरपर्यंत लांब असतात. त्याचे विष न्यूरोटॉक्सिक आहे, जे थेट मज्जासंस्थेवर परिणाम करते. हा साप चावल्यानंतर अर्ध्या तासात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. 

रॅटल साप- रॅटल स्नेक हा उत्तर अमेरिकेत आढळणारा सर्वात विषारी साप आहे. शेपटीच्या शेवटी अंगठ्यासारखी बनलेली असते, त्यामुळे तो आवाज करतो असंही म्हटलं जातं. या सापाचे विष हेमोटॉक्सिक आहे, जे मानवी रक्तात मिसळतं. अँटीवेनम वेळेत उपलब्ध नसेल तर मृत्यू अटळ आहे.

पिट वाइपर- पिट व्हायपर साप मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यांची लांबी 4 ते 7 फूट असते. त्यांच्या विषामध्ये अँटीकोआगुलंट असते, त्यामुळे ब्रेन हॅमरेज होण्याची भीती असते. हा साप एकावेळी 90 मुलांना जन्म देतो. वेळेवर अँटीवेनम न मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होऊन बसते.

ईस्टर्न टाइगर स्नेक 
ईस्टर्न टायगर साप दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलिया आणि तस्मानियाच्या पर्वत आणि गवताळ प्रदेशात आढळतो. त्याच्या शरीरावर पिवळे आणि काळे ठिपके असल्याने याला टाइगर स्नेक म्हणतात. त्याचे विष अवघ्या 15 मिनिटांत माणसाला मारू शकते. 

Read More