Marathi News> विश्व
Advertisement

जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य... गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जगातील  सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य... गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oldest living chicken: एका कोंबडीचं साधारण आयुष्यमान हे दोन ते तीन किंवा जास्तीत जास्त पाच ते आठ वर्ष इतकं असतं. पण तुम्हाला माहित आहे जगातल्या सर्वात वृद्ध कोंबडीचं (World oldest chicken) वय ती आहे. या कोंबडीचं नाव पीनट (Peanut) असं आहे. नुकताच या कोंबडीचा 21 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वर्षाच्या सुरुवातीला पीनट कोंबडीने 20 वर्ष 272 दिवस पूर्ण केलें आणि सर्वात वृद्ध जिवंत कोंबडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मागे टाकला.

पीनट कोंबडीच्या मालकाचं नाव मार्सी पार्कर डार्विन असं आहे. डार्विन यांनी दिलेल्या माहितीनुसार एक कोंबडी साधारणत: 5 ते 8 वर्ष जगते. पण पीनटने तब्बल 21 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट असल्याचं ते म्हणतात. वय वाढल्यानंतर पीनट असूनही तितकीच तंदरुस्त आहे. पीनट एकदम लक्झरी आयुष्य जगते. तिला राहण्यासाठी खास रुम आहे. तर खाण्या-पिण्याचेही तिचे खास पदार्थ आहेत. दररोज सकाळी नाश्तात पीनटला ब्लूबेरी दही लागतं. आणि वेळेवर तीला नाश्ता मिळाला नाही तर ती ओरडून घर डोक्यावर घेते असं तिचा मालक मार्सी पार्कर सांगतो.

पीनटची लाईफस्टाईलही अगदी आरामदायक आहे. मालक मार्सी पार्कर यांना पीनट कशी सापडली याची कहाणीसुद्धा अगदी मजेशीर आहे. अमेरिकेतल्या मिशिगनमध्ये मार्सी पार्कर डार्विन यांना एका पोल्ट्री फार्ममध्ये पडलेलं एक अंड सापडलं. आधी त्यांना हे अंड खराब आहे. त्यांनी ते उचललं आणि कासवाना खायला घालता येईल म्हणून आपल्याबरोबर घरी आणलं. मार्सी पार्कर यांनी आपल्या घरातील तळ्यात काही कासवं पाळली होती. त्या कासवानं खायला घालण्यासाठी मार्सी पार्कर अंड फेकणार इतक्यात अंड फुटलं आणि त्यातून कोंबडीचं पिल्लू बाहेर आलं.

मार्सी पार्कर यांनी कोंबडीचं ते पिल्लू सांभाळण्याचा निर्णय घेतला. आकाराने ते पिल्लू लहान असल्याने तिचं नाव पीनट असं ठेवलं. आता पीनट वर्षांची आहे. मार्सी पार्कर यांच्याकडे मांजरी आणि श्वानही आहेत. पीनट या पाळिव प्राण्यांबरोबरच एका मोठ्याश्या खोलीत राहते. पीनटला मार्सी पार्करच्या कुशीत झोपण्याची सवय आहे. जगात सर्वात वृद्ध कोंबड्याचं वय 23 वर्ष 152 दिवस इतकं आहे. पीनट या कोंबड्यापेक्षा आता फक्त दोन वर्षांनी लहान आहे. 

Read More