Marathi News> विश्व
Advertisement

संकटात सापडलेल्या महिलेला पोलिसांनी मदत करण्यास का दिला नकार? काय आहे नेमकं प्रकरण

ती महिला फोनवर सांगते की, मी सगळ्या ठिकाणी मदत मागून झाली आहे. आता शेवटी निराश होऊन तुम्हाला फोन केला आहे. पोलीसही आपुलकीने त्या महिलेची विचारपूस करतात आणि महिलेला कशाबद्दल मदत हवी आहे, हे विचारताच मात्र पोलिसांना राग अनावर होतो.

संकटात सापडलेल्या महिलेला पोलिसांनी मदत करण्यास का दिला नकार? काय आहे नेमकं प्रकरण

मुंबई : पोलीस हे आपल्या रक्षणासाठी आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संकटात मदतीसाठी पोलीस कायम तयार असतात. त्यासाठी आपातकालीन परिस्थितीत मदत मिळावी म्हणून पोलिसांनी आपातकालीन हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. दिवसभरात या आपातकालीन विभागात अनेक फोन येत असतात.

एक फोन पोलीस विभागात येतो, जो सगळ्यांची झोप उडवतो. हा फोन संकटात सापडलेल्या एका महिलेचा असतो. ती महिला फोनवर सांगते की, मी सगळ्या ठिकाणी मदत मागून झाली आहे. आता शेवटी निराश होऊन तुम्हाला फोन केला आहे. पोलीसही आपुलकीने त्या महिलेची विचारपूस करतात आणि महिलेला कशाबद्दल मदत हवी आहे, हे विचारताच मात्र पोलिसांना राग अनावर होतो.

कारण या महिलेनं जी मदत मागितली ती खूपच हस्यास्पद आहे. जी ऐकून तुम्हाला देखील यावर काय प्रतिक्रीया द्यावी हे कळणार नाही.

fallbacks
प्रतिकात्मक फोटो

'या' कारणासाठी महिलेचा पोलिसांना फोन
तुम्हा आम्हाला अनेकांना पाल, झुरळ या सारख्या किटकांची भीती वाटते. या किटकांना घरातून घालविण्यासाठी आपण इतरांची मदत घेतो. या महिलेचा घरात मोठा कोळी होता. या कोळीमुळे ती हैरान झाली होती. परंतु तिने या कोळीपासून सुटका मिळवण्यासाठी स्वत:हून कोणताही प्रयत्न न करता थेट पोलिसांकडे मदत मागितली.

जे ऐकून रागावलेल्या पोलिसांनी महिलेला मदत करण्यास नकार दिला आणि तिला पोलिसांनी चार गोष्टीही सुनावल्या. ही घटना यूनाइटेड किंगडममध्ये घडली आहे.  

Read More