Marathi News> विश्व
Advertisement

बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यास का आहे मनाई? जाणून घ्या खरं कारण

Dubai Burj Khalifa Top Floor: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाबाबत अनेकांना उत्सुकता असते. जगभरातून लाखो पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात. याबाबत एक रंजक माहिती जाणून घ्या

बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यास का आहे मनाई? जाणून घ्या खरं कारण

Dubai Burj Khalifa Top Floor: दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. समुद्राच्या काठावर वसलेली हा वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भेट देतात. दुबईत बुर्ज खलिफाचे बांधकाम  2010मध्ये पूर्ण झाले होते. ही इमारत पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी लाखो लोक भेट देत असतात. बुर्ज खलिफा पाहण्यासाठी तिकिट काढून जावे लागते. त्यानंतर तुम्ही ही गगनचुंबी इमारत पूर्ण फिरु शकता. मात्र, तुम्हाला हे माहितीये का तिकिट खरेदी केल्यानंतरही बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरवर जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये. यामागे नेमकं काय कारण आहे, हे जाणून घेऊया. 

बुर्ज खलिफा ही फक्त पर्यटन स्थळ नसून या इमारतीत हजारो लोक राहतात. 200 मजली इमारतीत घरे, मनोरंजन स्थळे, जलतरण तलावही आहेत. या इमारतीची उंची 828 मीटर इतकी आहे. म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या उंचीपासून फक्त 56 मीटर कमी आहे. उलटा Y या आकारात ही इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळं इमारतीचे बांधकाम मजबूत होते. 

भूकंपही झेलू शकते 

बुर्ज खलिफा इमारतीचे बांधकाम मजबूत करण्यात आले आहे. या इमारतीत खास सुविधाही देण्यात आल्या आहेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्याचबरोबर लिफ्टसोबतच कॉक्रिंटच्या पायऱ्याही देण्यात आल्या आहेत. या इमारतीला भूकंपातही कोणता धोका पोहचू शकत नाही. ही इमारत 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपही झेलू शकते. कनेक्टिव्हीटीसाठी बुर्ज खलिफाच्या आजूबाजूच्या इमारतींनाही कनेक्ट केले आहे. 

वरच्या मजल्यावर जाण्यास मनाई का

बुर्ज खलिफा इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यास कोणालाच परवानगी का देण्यात येत नाही, हे आत्ता जाणून घेऊया. इमारतीत शेवटच्या मजल्यावर अनेक मोठ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिस, वर्क स्पेस आणि मोठे कॉन्फरन्स हॉल आहेत. त्यामुळं वरच्या मजल्यावर या ऑफिससंबधीत लोकांनाच जायची परवानगी दिली जाते. मात्र, अनेकदा खास परवानगी काढून मोठे सेलिब्रिटी किंवा व्यापारी बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरवर फोटोशूटसाठी जातात. मात्र, अशा प्रकारची परवानगी खूप कमी वेळा मिळते. सगळ्यांनाच बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी परवानगी मिळत नाही. 

दरम्यान, 2004 साली बुर्ज खलिफाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. पाच वर्षांत ही इमारत बांधण्यात आली आहे. दुबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करुन देण्यासाठी ही इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीत एकूण 57 लिफ्ट्स आणि 8 एस्कलेटर्स आहेत. 

Read More