Marathi News> विश्व
Advertisement

Israel News : इस्रायलवर आकाशातून मिसाईल्सचा 'पाऊस', अत्याधुनिक 'आयर्न डोम' फेल का गेलं ?

Israel Iron Dome technology : हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं साऱ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिलाय. इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा भेदून हमासनं हल्ला केलाच कसा? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

Israel News : इस्रायलवर आकाशातून मिसाईल्सचा 'पाऊस', अत्याधुनिक 'आयर्न डोम' फेल का गेलं ?

Why Iron Dome technology failed : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करत अक्षरश: धुमाकूळ घातला.इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमासनं अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा उभारल्याचं बोललं जातंय. एकाच वेळी इस्रायलवर 5 हजार क्षेपणास्त्र डागत हमासनं महायुद्ध (Israel Hamas War) छेडलंय. आकाश, जमीन आणि पाणी मिळेल त्या मार्गानं हमासचे दहशतवादी इस्रायलच्या सीमेत घुसखोरी करत होते. आता सर्वांनाच हाच प्रश्न पडलाय. इस्रायलची सुरक्षाव्यवस्था हमासनं भेदली कशी? हमासच्या हल्ल्यापुढे इस्रायलचं आयर्न डोम अपयशी का ठरलं?

इस्रायलचं आयर्न डोम फेल?

शत्रूचा सामना करण्यासाठी इस्रायलनं स्वतंत्र यंत्रणा विकसीत केलीय. ही यंत्रणा इस्रायलवर होणारे हवाई हल्ले रोखण्याचं काम करते. हवाई सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या आयर्न डोमचे रडार, लॉन्चर आणि कमांड पोस्ट असे तीन भाग आहेत. इस्रायलच्या आकाशात धोका असल्याचं रडार निश्चित करतं. त्यानंतर लॉन्चरद्वारे क्षेपणास्त्रं आकाशात सोडली जातात आणि ती संशयास्पद वस्तू नष्ट केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचं काम कमांड पोस्टद्वारे केलं जातं. 

दरम्यान, इस्रायलची ही यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. कारण हमासनं यापूर्वीही अनेकदा हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे सगळे हवाई हल्ले निष्प्रभ ठरले. त्यामुळे यावेळी इस्रायलचं सुरक्षा कवच भेदण्यासाठी हमासनं साल्वो रॉकेटचा वापर केला. हा रॉकेट हल्ला इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेला रोखता आला नाही. म्हणूनच त्यांची यंत्रणा प्रत्युत्तर देण्यापूर्वीच हमासनं 20 मिनिटांत तब्बल 5 हजार क्षेपणास्त्रं डागली.

हमासचा ग्राऊंड अटॅक

इस्राईलची मैदानावरील सुरक्षाही अत्यंत कडक आहे. गाझा आणि इस्रायलमधील सीमेवर कॅमेरे, ग्राउंड मोशन सेन्सर्स आणि सतत सैन्य गस्त सह, मजबूत कुंपण आहे. भिंतींवर काटेरी तारा आहेत जेथे या वेळी झालेल्या घुसखोरीची शक्यता कमी झाली आहे. मात्र, हमासच्या सैनिकांनी बुलडोझरच्या सहाय्याने या भिंती पाडल्या, तारा कापून समुद्रमार्गे आणि पॅराग्लायडर्सच्या मदतीने इस्रायलमध्ये प्रवेश केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलचं सैन्य कमी पडलं, अशी प्राथमिक माहिती रॉयटर या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Read More