Marathi News> विश्व
Advertisement

ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काय-काय पाहतात कर्मचारी; रिपोर्टमधून 'ही' धक्कादायक बाब समोर

काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, तर काही लोक असे असतात, जे या ब्रेक टाइममध्ये शॉपिंग साइटवर काहीतरी शोधतात. 

ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काय-काय पाहतात कर्मचारी; रिपोर्टमधून 'ही' धक्कादायक बाब समोर

मुंबई : ऑफिसमध्ये काम करताना, बहुतेक लोक मधेच उठतात आणि छोटा ब्रेक घेतात. या दरम्यान बरेच लोक थोडं पायी चालतात, तर काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, तर काही लोक असे असतात, जे या ब्रेक टाइममध्ये शॉपिंग साइटवर काहीतरी शोधतात. पण लोक ऑफिसच्या वेळेतही पॉर्न पाहतात का?

ऑफिसमध्ये पॉर्न पाहणं लाजिरवाणं मानलं जातं परंतु एडल्ड कंटेट प्लॅटफॉर्म, सायबर सुरक्षा आणि मानसशास्त्रज्ञ मानतात की, काम करताना पॉर्न पाहणं सामान्य आहे.

यावरील एका संशोधनातून असं समोर आलंय की, काम करताना पॉर्न पाहणं लोकांना समजतात तितकं असामान्य नाही. 'शुगरकुकी' या डिजिटल लाइफस्टाइल मॅगझिनसाठी केलेल्या जागतिक सर्वेक्षणात 60 टक्क्यांहून अधिक लोकांनी ऑफिसमध्ये काम करताना पॉर्न पाहिल्याचं कबूल केलंय.

सिक्योरिटी फर्म कॅस्परस्कीने 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, घरून काम करणाऱ्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी कबूल केलं की, ते कॉम्प्युचर किंवा मोबाइल फोनवर एडल्ट कंटेट पाहण्यास अजिबात संकोच करत नाहीत.

2021 मध्ये, जगातील एका पॉर्न साइटने केलेल्या जागतिक अभ्यासाने लोक कामाच्या वेळेत पोर्नोग्राफी पाहतात या मताचं समर्थन केलं. त्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बहुतेक लोकं रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत पोर्नोग्राफी पाहतात. त्याच वेळी, ऑफिसची वेळ संपत असताना संध्याकाळी 4 वाजता देखील पॉर्नोग्राफी पाहणारे बरेच लोक असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.

ऑफिसमध्ये का पाहतात लोकं पॉर्न?

साइकोलॉजिकल रिसर्चमध्ये असं समोर आलंय की, ऑफिसमध्ये पोर्नोग्राफी पाहण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोकांना कामाच्या दरम्यान कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ते पॉर्न पाहून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. 

दरम्यान याच, अनेक लोक ऑफिसमध्ये पॉर्न पाहतात जेणेकरून त्यांना नवीन अनुभवाचा आनंद घेता येईल. अनेकदा लोक पॉर्न देखील पाहतात ज्यामुळे त्यांना काही नवीन अनुभव मिळू शकतील जो सहसा त्यांच्या लैंगिक जीवनातून मिळत नाही.

यूकेमधील बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीमधील आरोग्य मानसशास्त्राचे प्राध्यापक क्रेग जॅक्सन यांनी एका इंग्रजी वेबसाईटला सांगितलं की, "हे सर्व घटक लोकांना कामाच्या ठिकाणी पोर्नोग्राफी पाहण्यास प्रोत्साहित करतात. ऑफिसमध्ये पॉर्न अशाच व्यक्ती पाहतात ज्यांना, एखाद्या गोष्टीवर प्रचंड राग येतो. हे लोक तणाव कमी करण्यासाठी असं करतात.

Read More