Marathi News> विश्व
Advertisement

Video : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का

Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल. 

Video : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का

Wedding video viral : लग्नाचा (Wedding video) क्षण हा नवरदेव नवरीसाठी (bride and groom) आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय (memorable day) असतो. त्या क्षणाचे आठवणी डोळ्यात सामावून घेण्यासाठी प्रत्येक जोडपं उत्सुक असतं. लग्न हे फक्त दोन जीवांचं मिलन नाही तर दोन कुटुंबाचं मिलन असतं. लग्नात नवरदेव नवरीच्या आई वडिलांपासून नातेवाईक आणि मित्रमैत्रीणी या सोहळ्यासाठी उत्साही असतात. आजकाल लग्नातील प्रत्येक सोहळ्यात जोरदार सेलिब्रेशन करण्यात येतं. लग्न अजून आज एक ग्रँड इव्हेट असतो. (Wedding Bride and Groom video blindfolds groom and guests at her wedding reason in emotional video viral on Instagram trending now)

पण सध्या सोशल मीडिया एका लग्नाची चर्चा सुरु आहे. कारण या लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. नवरी सोडली तर नवरदेवापासून वऱ्हाड्यांनी डोळ्यांवर काळा रंगाची पट्टी बांधली आहे. आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं आणि हटके कसं असावं यासाठी वेगवेगळे अनोख्या पद्धती शोधन काढल्या जातात. 

इंग्लंडमधील (England ) बर्मिंघममध्ये  (Birmingham) राहणारी लुसी एवर्ड्सने (Lucy Edwards) 31 ऑगस्टला ओली केव (Ollie) यांच्याशी लग्न केलं. पण या लग्नाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. लुसी जेव्हा 17 वर्षांची होती तेव्हा तिचं ओली केववर प्रेम झालं. प्रेमाच्या वातावरणाला दोन महिन्यात नकारात्मक घटनेने ग्रासलं. लुसीला इनकॉन्टिनेंटिया पिगमेंटि या अतिशय दुर्मिळ अशा आजाराने गाठलं. त्यामुळे लुसीने आपली दृष्टी गमावली. 

इन्स्टाग्रामवर (Instagram) लुसीने आपल्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या आयुष्यातील हा अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे, आम्हाला दोघांसाठी हा खूप खास अनुभवहोता. जरी ऑली हा क्षण पाहू शकला नसला तरी त्याच्यासाठी आणि माझ्या सर्व पाहुण्यांसाठी हा अनुभव घेणे खरोखरच आनंददायक असेल. मी आज जगाला आपल्या डोळ्याने पाहू शकतं नाही, असा वेळी मला आयुष्यात काय अनुभव येतं असेल. याचा अनुभव माझ्या लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि वऱ्हाड्यांनी घेतला. 

नेटिझन्स झाले भावूक 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येकाचं लक्ष वेधत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. एका युजर्सने म्हटलं आहे की, मी पाहिलेली किंवा ऐकलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. एका युजर्सने नवरदेवाचं कौतुक केलं आहे. गर्लफ्रेंड जग पाहू शकतं नाही हे माहिती अजून तिने तिची साथ सोडली नाही. तिच्याशी लग्नही केलं. 

Read More