Marathi News> विश्व
Advertisement

परिक्षेला प्रश्नांची उत्तर येत नसतील, तर काय करावं? जास्त विचार करु नका... एकदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पेपर सोडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

परिक्षेला प्रश्नांची उत्तर येत नसतील, तर काय करावं? जास्त विचार करु नका... एकदा हा व्हिडीओ पाहा

मुंबई : सोशल मीडियावर दररोज आपल्या समोर अशा काही गोष्टी समोर येतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. येथे आपल्यासमोर कधी कोणती गोष्टी येईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सेन्सेशनल आहे. हा एका लहान मुलाचा व्हिडीओ आहे. जो एक ट्रिक घेऊन आला आहे. याच कारणामुळे त्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पेपर सोडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्यामुलाला पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येत नाही आहे. ज्यामुळे तो डोळे बंद आणि हात जोडून बसला आहे.

यानंतर हा मुलगा डोळे बंद ठेऊन हातातील पेन्सील पेपरवर फिरवतो आणि एका ठिकाणी आपल्या तुक्का लावतो आणि आपले डोळे उघडतो. यावेळी त्याची पेन्सील ज्या उत्तरावर असेल, तो उत्तर तो फायनल करतो आणि ते उत्तर पेपरमध्ये लिहून टाकतो.

हा लहान मुलगा असं सारखं सारखं करत असतो आणि आपला संपूर्ण पेपर सोडवतो.

हा मजेशीर व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तुक्का’ लावून प्रश्न सोडवण्याची योग्य ‘पद्धत’.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या लहानपणी पेपर सोडवताना अशीपद्धत कदाचित अवलंबली असेल, याच कारणामुळे लोकांना हा व्हिडीओ जास्त रिलेट होत आहे. म्हणूनच तो जोरदार व्हायरल होत आहे.

Read More