Marathi News> विश्व
Advertisement

सिंहीण आणि अस्वलसोबत सेल्फी काढणं मुलीच्या आलं उराशी Video Viral

मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सिंहीण आणि अस्वलसोबत सेल्फी काढणं मुलीच्या आलं उराशी Video Viral

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. (Animal Viral Video) कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. दरम्यान, नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालताना एक तरुणी दिसत आहे. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक धोकादायक प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ सेल्फी काढताना दिसते. सेल्फी काढणं या मुलीच्या उराशी आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : 'फक्त एक दिवस बाकी...', समंथा रुथ प्रभूची 'ती' पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ _hasret_kokulum_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एका पिंजऱ्यात सिंहीण तर दुसऱ्या पिंजऱ्यात अस्वल आहे. यावेळी ती तरुणी अस्वलच्या पिंजऱ्या समोर जाऊन सेल्फी काढते. हे पाहता ते अस्वल पिंजऱ्यातून हात बाहेर काढत त्या मुलीचं टी-शर्ट ओठत असल्याचे आपण पाहू शकतो. फोटो काढण्यासाठी या मुलीनं चक्क तिचा जीव धोक्यात घातला आहे. (Viral Video girl was taking selfie with lioness and bear wild animals watch what happend next) 

हा व्हायरल व्हिडीओ पाहा -

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओला पाहून प्रत्येकजण घाबरत आहे. हा व्हिडिओ खरोखरच हृदय पिळवटून टाकणारा आहे. आतापर्यंत 42 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिले की, 'जीवन अमूल्य आहे. अशा मूर्खांच्या हाती तो हरवता कामा नये.' आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'अस्वलही म्हणत असेल की ये मी तुझ्यासोबत सेल्फी काढतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा निव्वळ मूर्खपणा आहे. सेल्फी काढण्याच्या शर्यतीत लोक आंधळे होत आहेत.'

Read More