Marathi News> विश्व
Advertisement

Elon Musk आणि Donald Trump यांचा जबरदस्त डान्स, 90 लाख लोकांनी पाहिला Video

AI Dance Video : टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले एलन मस्क आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका डान्स व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मायकल जॅक्सनच्या एका गाण्यावर दोघंही डान्स करताना दिसत आहेत. 

Elon Musk आणि  Donald Trump यांचा जबरदस्त डान्स, 90 लाख लोकांनी पाहिला Video

Elon Musk and Trump Dance Video : टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले एलन मस्क (Elon Musk) आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या एका डान्स व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मायकल जॅक्सनच्या एका गाण्यावर दोघंही डान्स (Dance Video) करताना दिसत आहेत. एलन मस्क स्वत:च्या मालकीच्या असलेल्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर प्रचंड सक्रिय असतात. अनेक विषयांवर ते आपलं मत मांडतात, किंवा एकाद्या विषयावर पोस्ट शेअर करतात. मस्क यांनी एक्सवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या दोन दिवसात या  व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आहे. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मस्क यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओत एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प मायकल जॅक्सनच्या एका गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वास्तविक एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्पचा हा व्हिडिओ AI जनरेटेड आहे. या व्हिडिओत एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प सूटाबूटात दिसत आहेत. मायकल जॅक्शनच्या लोकप्रिय बी जीज गाण्यावर मायकल जॅक्सनसारख्या पोझ देत डान्स करताना दिसत आहेत. 

एआय जनरेटेड असलेला हा व्हिडिओ अगदी हुबेहुब खऱ्या व्हिडिओसारखा दिसतो. हा व्हिडिओ स्वत: एलन मस्क यांनी पोस्ट केला असून त्याला एक कॅप्शनही दिला आहे. त्यात मस्क यांनी म्हटलंय, 'हेटर्स आता हा व्हिडिओ एआय असल्याचं म्हणतील, आम्ही तुम्हाल दोन व्यक्तीमंचा खास व्हिडिओ दाखवतो, जो खरोखरच एआयने बनवला आहे

90 लाखाहून अधिक व्ह्यूज
एलन मस्क यांनी सोशल मीडिया एक्सवर हा व्हिडिओ भारतीय वेळेनुसार 14 ऑगस्टला संध्याकळी 8.54 मिनिटांनी शेअर केला. अवघ्या दोन दिवसात या व्हिडिओला  96.5 मिलियन व्ह्यूज आणि 1.4 मिलिअन लाईक्स मिळाले आहेत. हजारो लोकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.  

Read More