Marathi News> विश्व
Advertisement

Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.

Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Women Body Slam Viral Video : सोशल मीडिया (social media video) हे असं जग आहे जिथे क्षणा क्षणाला कुठला ना कुठला व्हिडीओ किंवा घटना वाऱ्यासारखी पसरते. आज सोशल मीडियाच्या जगात एक सेकंदात बातमी अख्खा जगाला कळते. व्हिडीओ किंवा फोटोच्या माध्यमातून अनेक धक्कादायक गोष्टी जगा समोर येता. चांगल्या चांगल्या लोकांचे कृत्य कॅमेऱ्यात कैद आणि त्यांचा खरा चेहरा कळतो. असं एका पोलिसाचं धक्कादायक कृत्य कॅमेऱ्याक कैद झालं आणि तो व्हिडीओ पाहून यूजर्स संतापले आहेत. 

महिलेच्या त्या कृत्यानंतर पोलिसांनी तिला...

रस्त्याच्या कडेला लावलेल्या कार पार्किंगवरुन एका महिलेचं आणि पोलिसाचा वाद सुरु असल्याचा व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तो पोलीस महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. ती महिला एकटी नसून त्याचा कडेवर एक लहान मुलगा देखील आहे. (Viral Video chinese cop body slams woman holding her baby to the ground on social media trending google news in marathi)

त्यांची तील वादावादी एवढी वाढते की, ती महिला पोलिसाच्या छातीला हात लावून हलका धक्का मारते. महिलेच्या या कृत्याचा पोलिसाला संताप होतो आणि तो महिलेवर पलटवार करतो. तो पोलीस अधिकारी आव बघत नाही ताव बघत नाही. महिलेला थेट धक्का देऊन जमिनीवर पाडतो. 

धक्कादायक व्हिडीओ

त्या सगळ्या हातापायीमध्ये तो मुलगाही जमिनीवर जोरदार आपटतो. इथे असलेला स्थानिक लोक या घटनेचा व्हिडीओ बनवतात. ही घटना पाहून दोन स्थानिक लगचेच त्या महिला आणि मुलाच्या मदतीला धावतात. पोलीस कारमध्ये बसलेला दुसरा पोलीस अधिकारी लगचेच कारच्या बाहेर येतो आणि महिला धरुन ठेवतो. 

पोलिसाचं हे धक्कादायक कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ते पाहून नेटकरी संतापले आहेत. ते लहान मुलं जोरदार जमिनीवर आपटल्यामुळे रडू लागतं. मिळालेल्या माहितीनुसार कार पार्किंग तिकिटावरून महिला आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. 

दोष कोणाचा ?

मेट्रोवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना शांघायच्या सॉन्गजियांग जिल्ह्यात आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्या महिलेला हातकडी घालून गाडीत बसवलं. त्यानंतर आई आणि मुलाला पोलीस स्टेशनमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर चीनमधील प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आलं की, त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्वीटरवर @FightHaven या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सने पोलीस अधिकाऱ्याच्या वागणुकीबद्दल टीका करण्यात आली आहे. 

Read More