">
Marathi News> विश्व
Advertisement

पत्नीची प्रसुती पाहिली, पतीला जडला गंभीर आजार... रुग्णालयावर ठोकला नुकसान भरपाईचा दावा

पत्नीची प्रसुती होताना पाहाण्याची परवानगी हल्ली अनेक रुग्णालयात दिली जाते. एक व्यक्तीने आपल्यी पत्नीची प्रसुती होताना पाहिलं आणि त्याला गंभीर जडला. याला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप करत त्या व्यक्तीने कोर्टात नुकसान भरपाईचा दावा ठोकला

पत्नीची प्रसुती पाहिली, पतीला जडला गंभीर आजार... रुग्णालयावर ठोकला नुकसान भरपाईचा दावा

Viral News : एका व्यक्तीने एका रुग्णालयावर (Hospital) दावा ठोकला असून दहा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  पत्नीची प्रसुती (Delivery) होताना पाहिल्याने गंभीर आजार जडल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. पत्नीची सी-सेक्शन प्रसुती (C-Section Delivery  होत असताना रुग्णालयीतल डॉक्टरने त्याला प्रसुती तुम्ही पाहू शकता असं सांगितलं. पण डॉक्टरने सांगितल्याने आपण पत्नीची प्रसुती पाहिली आणि आपल्याला मानसिक आजाराने ग्रासलं असा दावा या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचं नाव अनिल कोप्पुला असं आहे. 

अनिल कोप्पुला हे ऑस्ट्रेलियात (Australi) राहात असून त्यांना मेलबर्नमधल्या रॉयल विमेन्स हॉस्पिटलविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली आहे. यात अनिल कोप्पुला यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालायाने आपल्याला प्रसुती पाहाण्यासाठी प्रोत्साहीत केलं. यावेळी पत्नीचे अंतरिक अवयव आणि रक्त पाहिलं. त्यामुळे आपल्या मनावर याचा परिणाम झाला असा आरोप अनिल कोप्पुला यांनी केला आहे. रुग्णालयाने आपल्या कर्तव्याचं उल्लंघन केलं असून त्यांनी याची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कोर्टात युक्तीवाद
अनिल कोप्पुला यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद करण्यात आला. पत्नीती प्रसुती पाहिल्याने आपल्याला मानसिक आजार जडल्याचं अनिल कोप्पुला यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं. तर रॉयल रुग्णालयाच्या वकिलांनी हे सर्व आरोप खोडून काढले. प्रसुती पाहण्याची जबरदस्ती कोणावरही केली जात नाही. प्रसुतीवेळी अनिल कोप्पुला हे रुग्णालयात होते ही बाब खरी असली तरी त्यावेळी त्यांनी विरोध केला नव्हता. तसंच प्रसुती पाहाताना त्यांना कोणताही त्रास किंवा चक्कर आली नव्हती. 

दोन्ही बाजूंचा युक्तीवा ऐकल्यानेतर कोर्टाने आपला निकाल सुनावला. अनिल कोप्पुला यांनी केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगत कोर्टाने ही प्रकरण बंद करण्याचे आदेश दिले. 

सी-सेक्सशन प्रसुती म्हणजे काय?
सिझेरियन प्रसूतीला सिझेरियन सेक्शन किंवा सी-सेक्शन (Cesarean section & C-section) प्रसुती असं म्हटलं जातं. जेव्हा गर्भवती स्त्री सामान्य परिस्थिती बाळाला जन्म देऊ शकत नाही, तेव्हा डॉक्टर सी-सेक्शनची निवड करतात. बाळाचं वजन जास्त असतं, मूल पोटात उलटे किंवा तिरकस झाले असेल, बाळाच्या विकासाची समस्या असले, बाळाला पोटात पुरेसा ऑक्सिजन मिळत नसेल तेव्हा सिझेरियनचा पर्याय दिला जातो. सी-सेक्शन प्रसूतीमध्ये गर्भवतीच महिलेच्या पोटात आणि गर्भाशयात कट मारून बाळाला बाहेर काढलं जातं. यानंतर, डॉक्टर टाके घालून पोट आणि गर्भाशय बंद करतात,

Read More