Marathi News> विश्व
Advertisement

Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?

Viral News : विमानात 153 प्रवासी आणि उड्डाण घेतल्यानंतर दोन्ही पायलट झोपले. त्यानंतर विमानाचा मार्ग चुकला...ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?

Viral News in Marathi : विमानातून असंख्य लोक दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असतात. विमानाच्या पायलटवर डोळे बंद करुन आपण जीव मुठीत घेऊन हा प्रवास करत असतो. उंच आकाशात गेल्यानंतर खिडकीबाहेरील दृष्यं पाहून आपण भारावून जातो. पायलटवरील विश्वास आपण तो प्रवास एन्जॉय करत असतो. पण एका धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. गार्डियनच्या रिपोर्टनुसार 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पायलट आणि को पायलट हे झोपी गेले. जवळपास अर्धा तास हे दोघेही झोपले होते. वैमानिकाचा हा निष्काळजीपणामुळे विमानाने आकाशात आपल्या मार्ग चुकला. (Viral News As soon as the plane with 153 passengers took off both the pilots fell asleep the plane lost its way and what happened next)

काय घडलं नेमकं?

झालं असं की, टेकऑफनंतर अर्ध्या तासाने फ्लाइट कॅप्टनला काही वेळासाठी आराम करायचा होता. त्यामुळे त्याने को पायलटला सांगितलं आणि त्याने डोळे बंद केले. दुसरीकडे को पायलटची आदल्या रात्री झोप झाली नव्हती. त्यामुळे फ्लाइट कॅप्टन झोपली असतानाच त्याचाही चुकून डोळा लागला, अशी माहिती समोर आली आहे. त्याच दरम्यान जकार्तामधील एरिया कंट्रोल सेंटरने विमानामधील पायलटशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळला नाही. जवळपास 28 मिनिट ते पायलटशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. एरिया कंट्रोल सेंटरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर 28 मिनिटांनंतर पायटला जाग आली आणि त्याने पाहिलं की को पायलटही झोपलेला आहे. हे दृष्य पाहून त्याला धक्काच बसला. 

...अन् विमानाने मार्ग चुकवला!

पायलटने तत्काळ को पायलटला उठवलं आणि विमानाचा मार्ग पाहिला तर त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या या निष्काळजीपणामुळे विमानाने मार्ग चुकवला होता. यानंतर दोघांनी एटीसीशी संपर्क साधून विमानाची दिशा बदलली आणि ठरलेल्या मार्गाने विमानाचा प्रवास सुरु केला. 

कुठली आहे ही घटना ? 

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना इंडोनेशियातील असून जानेवारी महिन्यात घडली होती.  सुलावेसीहून जकार्ताला 153 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानात ही धक्कादायक घटना झाली आहे. इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने बाटिक एअरवेजला या घटनेबद्दल फटकारलं. बाटिक Airways ने जाहीर केलं आहे की ते सर्व सुरक्षा शिफारशी लागू करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि घटनेसाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

 

Read More