Marathi News> विश्व
Advertisement

VIDEO: खोल समुद्रात संशोधकांवर शार्कने केला हल्ला आणि मग...

खोल समुद्रात उतरुन समुद्रातील जीवांची रक्षा करण्याचं आणि संशोधनाचं काम खूपचं कठीण असतं. प्रत्येक समुद्री जीवशास्त्रज्ञ आपला जीवाची पर्वा न करता हे काम करत असतात.

VIDEO: खोल समुद्रात संशोधकांवर शार्कने केला हल्ला आणि मग...

नवी दिल्ली : खोल समुद्रात उतरुन समुद्रातील जीवांची रक्षा करण्याचं आणि संशोधनाचं काम खूपचं कठीण असतं. प्रत्येक समुद्री जीवशास्त्रज्ञ आपला जीवाची पर्वा न करता हे काम करत असतात.

समुद्रात कधी कुठला जीव हल्ला करेल याबाबत कुणीही अंदाज लावू शकत नाही. समुद्री जीवशास्त्रज्ञांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, खोल समुद्रात समुद्र जीवांची रक्षा तसेच संशोधनासाठी समुद्रात उतरलेल्या टीमवर शार्क मासा हल्ला करणार असतो मात्र, शार्क त्याच्या बचावासाठी येतो.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ दक्षिणी प्रशांत महासागरातील आहे. समुद्री जीवशास्त्रज्ञ नैन होसियर हे स्कूबा डायव्हींग करत व्हेल मासे आणि इतर सागरी जिवांची पाहणी करत होते. त्याच दरम्यान शार्कने त्यांच्यावर हल्ला केला. 

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, समुद्रात एक शार्क अचानक हल्ला करतो. मात्र, त्याचवेळी व्हेलमासा या शार्कला दूर करताना दिसत आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ ऑक्टोबर २०१६ मधील आहे. या संशोधकांच्या टीमच्या मते, शार्क त्यांच्या महिला सदस्यावर हल्ला करणार होता. मात्र, व्हेलने तिचे प्राण वाचवले.

VIDEO: खोल समुद्रात संशोधकांवर शार्कने केला हल्ला आणि मग...

Read More