Marathi News> विश्व
Advertisement

मंगळावर हॅलिकॉप्टर उडवणार नासा, व्हिडिओ व्हायरल

नासा आपल्या मंगळ ग्रहाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळविण्याच्या तयारीत आहे. 

मंगळावर हॅलिकॉप्टर उडवणार नासा, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : अमेरिका अंतराळ एजंसी नासा आपल्या मंगळ ग्रहाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळविण्याच्या तयारीत आहे. २०२० पर्यंत मंगळाच्या धर्तीवर पुढच्या पिढीचा रोवर तैनात करू इच्छिते. त्या दिशेने पाऊल टाकताना नासाने मंगळाच्या धर्तीच्या दिशेने रोवर्स पाठवलाय. त्या धर्तीवर छोट हॅलीकॉप्टर उडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मंगळाच्या धर्तीवर एअरक्राफ्ट उडविण्याची पहिली वेळ आहे. रिमोट कंट्रोलवर संचलित असलेल्या या हॅलिकॉप्टरच वजन साधरण ४ पाऊंड इतक आहे. पातळ ब्लेडच्या सहाय्याने हे हॅलिकॉप्टर उड्डाण घेत. या पंखाचा स्पी ३ हजार आरपीएम असल्याचे नासातर्फे सांगण्यात आल. जमीनीपासून हे हॅलिकॉप्टर ४० हजार फूट उंच उड्डाण घेत. मंगळावरील वातावरण हे केवळ १ टक्केच पृथ्वीप्रमाणे आहे. त्यामुळे एक लाख फूट उंचीसमान आहे.

महत्वकांक्षी प्रोजेक्ट 

आपला महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट रोटोक्राफ्टला कारच्या आकाराच्या रोवरसोबत जोडून पाठवण्यात आलय. इथे रोवर हॅलिकॉप्टरला दिशा निर्देश करेल असे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल. मंगळाच्या धर्तीवर हॅलिकॉप्टर उडविण्याची आयडिया रोमांचकारी आहे. यामुळे मंगळावरील महत्त्वाच्या हालचाली कळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. २० दिवसाच्या फ्लाइट टेस्टचा अवधी ठेवण्याची ते योजना आखत आहेत. यामध्ये काही छोट्या फ्लाइट आहेत.  यामध्ये ३० सेकंदाचे उड्डाणदेखील आहे. हॅलिकॉप्टरच्या सोलर सेल्समध्ये लिथियम इयोन बॅटरी असते जी रात्री उर्जा देण्याच काम करेल. 

Read More