Marathi News> विश्व
Advertisement

त्याने महिलेची छेड काढली अन्...पुढे काय झालं पाहा Video

Viral Video : महिलांना अनेक वेळा कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी ऑफिसमध्ये कुठे ना कुठे छेडछाडीला समोरे जावं लागतं.   

त्याने महिलेची छेड काढली अन्...पुढे काय झालं पाहा Video

Crime News : देश कितीही पुढे गेला तरी विकृत कृत्य करणारी लोक काही केल्या सुधारत नाही. महिलांना लोकल ट्रेनमधील (Local train) गर्दीत, कधी ऑफिसमध्ये (Office) तर कधी आपण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अगदी कुठेही छेडछाड करणारी टवाळखोर मिळतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही विकृत लोक महिलांची छेड (Harassment) काढतात. असाच एक धक्कादायक (shocking) प्रकार समोर आला आहे. 

त्याने महिलेची छेड काढली अन्...

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला लिफ्टमध्ये प्रवेश करते त्यानंतर एक पुरुष तिथे येतो. लिफ्ट (Elevator) सुरु होते आणि मग या विकृत पुरुषाने महिलेची छेड काढण्यास सुरुवात करतो. लिफ्टमध्ये (lift) कोण नसल्याचा फायदा घेत तो महिलेचा विनयभंग करतो. महिला त्याचा हात झटकते तरी देखील हा पुरुष सुधारत नाही. तो परत त्या महिलेच्या अंगाला हात लावायला जातो आणि मग...

व्हिडिओ व्हायरल 

लिफ्टमधील हा धक्कादायक आणि संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्या विकृत माणसाला आयुष्यात वाटलं नसेल की एक महिला त्याचावर भारी पडेल. तो पुरुष काही केल्या ऐकायला तयार नव्हता. हे लक्षात आल्यावर महिलेने रुद्र अवतार घेतला आणि त्याला आयुष्यभराची अद्दल घडवली. 

हेही वाचा - Video : माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? म्हणत भररस्त्यात तिघींनी एकीला धु-धु-धुतलं

धू-धू धुतलं
 

महिलेने लिफ्टमध्ये त्या पुरुषाला धो धो धुतलं. त्या महिलेने त्या नराधमाच्या प्रायव्हेट पार्टला लाथ मारली आणि त्याला कायमची अद्दल घडवली. यानंतर तो पुरुष कधीही कुठल्या महिलेकडे बघण्याची हिम्मत करणार नाही. हा व्हिडिओ ट्विटरवर LOCKERROOM या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 2 लाख पेज व्यूज मिळाले आहेत.

Read More