Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत

अमेरिका सरकारने पाकिस्तािला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचं हे पाऊल भारत सरकारने संघटनेविरोधात उठवलेल्या आवाजाचं समर्थन करणारं आहे.

अमेरिकेचा हाफिज आणि पाकिस्तानला दणका, भारताकडून निर्णयाचं स्वागत

नवी दिल्ली : अमेरिकेने जहशतवादी हाफिज सईदच्या पक्षाला दहशतवादी संघटना घोषित केली आहे. भारत सरकारने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अमेरिका सरकारचं हे पाऊल भारत सरकारने संघटनेविरोधात उठवलेल्या आवाजाचं समर्थन करणारं आहे. पाकिस्तानने हाफिज सईदच्या संघटनेवर कधीच कारवाई नाही केली याबाबत भारताने नेहमी आवाज उठवला आहे.

पाकिस्तानला दणका

पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची ओळख बदलण्याचा प्रयत्न करतो हे देखील सिद्ध झालं आहे. अमेरिका सरकारचं हे पाऊल सांगतं की, पाकिस्तानने कधीच दहशतवाद्यांविरोधात कारवाई नाही केली हे स्पष्ट झालं. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास कोणतंच समर्थन करत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

हाफिजच्या अडचणी वाढल्या

मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा नेता हाफिज सईदला अमेरिकेने मोठा झटका दिला. संयुक्त राष्ट्र अमेरिकेने मंगळवारी हाफिज सईदच्या राजकीय पक्षाला दहशतवादी संघटना घोषित केलं. दहशतद्यांच्या यादीत या संघटनेचं नाव टाकण्यात आला आहे.

Read More