Marathi News> विश्व
Advertisement

३२ कोटींचं बक्षीस असलेल्या दहशतवाद्यावर अमेरिकेचा ड्रोन हल्ला

...

३२ कोटींचं बक्षीस असलेल्या दहशतवाद्यावर अमेरिकेचा ड्रोन हल्ला

नवी दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तानच्या पूर्व कुनार भागात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अड्ड्यांवर ड्रोन हल्ला केला आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख आणि दहशतवादी मुल्ला फजलुल्लाह याला लक्ष्य करत अमेरिकेने ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, या हल्ल्यात मुल्ला फजलुल्लाह मारला गेल्याच्या वृत्ताला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाहीये.

मुल्ला फजलुल्लाह हा तेहरीक-ए-तालिबान चा प्रमुख आहे. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. इतकेच नाही तर त्याने नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई हिच्यावर हल्ला केला होता. कथीत स्वरुपात त्याने २०१० मध्ये न्यूयॉर्कच्या टाईम्स स्केअरवरही हल्ला करण्याचा प्लान आखला होता मात्र, तो यशस्वी झाला नाही.

लेफ्टनंट कर्नल मार्टिन ओ'डोनेल यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य दलातर्फे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात असलेल्या कुनार परिसरात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी १३ जून पासूनच मोहिम राबवली जात आहे. याच मोहिमे अंतर्गत मुल्ला फजलुल्लाह याला लक्ष्य करत ड्रोन हल्ला करण्यात आला.

मुल्ला फजलुल्लाहच्या तेहरीक-ए-तालिबाननेच डिसेंबर २०१४ रोजी पेशावरमधील आर्मी स्कूलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास १५० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १३२हून अधिक विद्यार्थी होते, ९ हून अधिक शाळेचा स्टाफ होता. तर, २४५ हून अधिक जखमी झाले होते.

Read More