Marathi News> विश्व
Advertisement

युक्रेनचा रशियावर 9/11 Style Attack! धक्कादायक Video समोर; खवळलेले पुतिन देणार उत्तर?

Ukraine Russia War 9/11 Style Attack Video: मागील अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धामध्ये युक्रेनने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात असून या हल्ल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युक्रेनचा रशियावर 9/11 Style Attack! धक्कादायक Video समोर; खवळलेले पुतिन देणार उत्तर?

Ukraine Russia War 9/11 Style Attack Video: रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धादरम्यान आता युक्रेनने रशियावर मागील अडीच वर्षांमधील सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियामधील सारातोवा परिसरामध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. युक्रेनने अचानक आक्रमक भूमिका घेत हल्ला केल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. यूक्रेनने रशियातील सारातोवमध्ये अमेरिकेवर झालेल्या 9/11 सारखा हल्ला केला आहे. युक्रेनने सारातोवमधील अनेक उत्तुंग इमारतींवर ड्रोनने हल्ले केले. हे ड्रोन थेट या इमारतींना धडकले आणि त्यांनी या इमारतींची नासधूस केली. मागील काही दिवसांपासून युक्रेनने रशियावरील हल्ल्याची तिव्रता अधिक वाढवल्याचं दिसून येत आहे.

रशिया मोठं उत्तर देण्याची शक्यता

युक्रेनने हल्ल्याचं प्रमाण वाढवल्याने आता रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करताना दिसत आहे. मात्र युक्रेन अशाप्रकारे रशियासारख्या बलाढ्य देशाला उत्तर देईल असं कोणाला वाटलं नव्हतं. युक्रेनने या हल्ल्यामधून रशिया हे युद्ध एकतर्फी जिंकणार नाही असे स्पष्ट संकेत दिले आहेत. युक्रेनने केलेला हा हल्ला वोलोदिमीर झेलेन्सी यांना महागात पडू शकतो असं युक्रेन आणि रशिया युद्धाचे अभ्यासक सांगत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे संतापून मोठा निर्णय घेऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढताना दिसत आहे. मागील काही काळापासून या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण शांतता होती. मात्र आता युक्रेनने थेट रशियामधील इमारतींवर हल्ले केल्याने रशिया जशास तसं उत्तर देण्यापासून मागे-पुढे पाहणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झालं तर हे युद्ध आणि एकंदरितच परिस्थिती अधिक चिघळू शकते.

45 ड्रोन वापरुन केला हल्ला

मागील काही आठवड्यांपासून युक्रेन सातत्याने रशियाच्या सीमेमधील शहरांवर हल्ले करत आहे. मागील आठवड्यामध्ये त्यांनी रशियावर 45 ड्रोन्सच्या माध्यमातून हल्ला केला होता. यूक्रेनने 2022 मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रशियावर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. रशियाने युक्रेनने पाठवलेली अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट केली.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोमधून युक्रेनचे 45 ड्रोन नष्ट करण्यात आले. 11 ड्रोन्स हे मॉस्कोच्या आकाशात नष्ट करण्यात आले. 23 ब्रायंस्कच्या अवकाशात तर 6 ड्रोन्स बेलगोरोदवरील आकाशात नष्ट केले गेले. त्याचप्रमाणे कलुगा येथे 3 आणि कुर्स येथे 2 ड्रोन्स हवेत नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे. 

Read More