Marathi News> विश्व
Advertisement

Video: दुबईत पावसाने हाहाकार! गुडघाभर पाण्यातून विमानांचं टेकऑफ, पुराच्या पाण्यात अडकल्या Rolls-Royce

Dubai Airport Flooded Viral Video: सोशल मीडियावर दुबईमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यापैकी अनेक व्हिडीओमध्ये गुडघाभर पाणी साचलेल्या रस्त्यांवर गाड्या अडकल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाऱ्यांमुळे वस्तू उडून गेल्याचंही दिसत आहे.

Video: दुबईत पावसाने हाहाकार! गुडघाभर पाण्यातून विमानांचं टेकऑफ, पुराच्या पाण्यात अडकल्या Rolls-Royce

Dubai Airport Flooded Viral Video: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील सर्वात स्मार्ट शहर असलेल्या दुबईची जगभरामध्ये तेथील श्रीमंतीसाठी चर्चा असते. जगभरातील अब्जाधिशांनी केलेली गुंतवणूक आणि येथील आलिशान घरांबरोबरच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर सध्या एक मोठं नैसर्गिक संकट ओढावलं आहे. युएईमध्ये मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येथे पावसाने हाहाकार माजवला आहे. या शहरातील भव्यता, चकाचक इमारती, मोठे रस्ते सारं काही जलयम झालं आहे. येथील मॉलपासून विमानतळांपर्यंत सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी भारलं आहे. 

विमानतळावर घोषणा

दुबई विमानतळाच्या रन-वेवर जवळपास गुडघाभर पाणी साचलं असून या पाण्यामधूनच काही उड्डाणं करण्यात आली. मात्र पाण्याची पातळी अधिक वाढल्याने जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेलं दुबई विमानतळ उड्डाणांसाठी बंद करण्यात आलं आहे. दुबई विमानतळाबरोबरच दुबईतील धक्कादायक परिस्थिती दाखवणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. विमानतळांवरील परिस्थिती सामान्य होईपर्यंत आणि पाण्याचा निचरा होईपर्यंत उड्डाणे डायव्हर्ट करण्यात आल्याच्या घोषणा विमानतळावर केल्या जात आहे. 

शेजारच्या देशात 18 जणांचा मृत्यू

दुबईमधील घरांमध्ये, मेट्रो स्थानकांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी भारलं आहे. दुबईमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्याबरोबर अनेक अब्जाधिशांच्या मालकीचे बंगले आणि फ्लॅट्स आहेत. युएईच्या शेजारचा देश असलेल्या ओमानमध्येही पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. या देशामध्ये अनेकजण बेपत्ता झाले आहेत. 

समुद्रकिनारी न जण्याचा सल्ला

दुबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर हॅण्डलवरुन, विमानतळावरील सर्व वाहतूक सध्या वळवण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मार्गाने जाणाऱ्या तुमच्या विमानांचं बदलेलं वेळापत्रक वेळोवेळी पाहत रहावे आणि विमान कंपन्यांच्या संपर्कात राहा असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे. तसेच विमातनळावर पोहचण्याआधी येथील परिस्थितीचा आढावा घेऊनच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे. दुबई पोलिसांनीही वादळासंदर्भातील इशारा जारी केला आहे. पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. "पाऊस, वेगवान हवा आणि विजांचा कडकडाट होत असून पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते," असं म्हटलं आहे.

गाड्यांच्या रांगा

दुबईमधील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचलं आहे. लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी भरलं असून त्यामध्ये कार तरंगताना दिसत आहेत. एका व्हिडीओत तर रॉल्स रॉयल गाडी पाण्यात अडकल्याचं दिसत आहे.

1)

2)

3)

4)

5)

पुढील काही दिवस दुबईमध्ये मध्यम ते सौम्य स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read More