Marathi News> विश्व
Advertisement

अबुधाबी, दुबईत दोन दिवस फ्रीमध्ये उतरण्याची प्रवाशांना सुविधा

या प्रवाशांना दुबई आणि अबुधाबीमध्ये ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नसेल

अबुधाबी, दुबईत दोन दिवस फ्रीमध्ये उतरण्याची प्रवाशांना सुविधा

नवी दिल्ली : यूएई सरकारनं जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना दुबई आणि अबुधाबीमध्ये उतरण्याची वेळ तुमच्यावरही आली असेल... अशावेळी या प्रवाशांना दुबई आणि अबुधाबीमध्ये ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नसेल. यूएईच्या शहरांमध्ये भारतीय पर्यटक आणि प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. यासाठी याचा सर्वात जास्त फायदा भारतीय प्रवाशांना होणार आहे. युनायटेड अरब अमीरात (यूएई) कॅबिनेटनं हा निर्णय घेतलाय.

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रान्जिट पॅसेंजर्सला ४८ तासांसाठी फ्रीमध्ये व्हिजा मिळणार आहे. त्यानंतर काही काळासाठी त्यांना व्हिजा वाढवून घ्यायचा असेल तर त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या फीमध्येही कपात करण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांच्या पैशांची बचतच होणार आहे. 

प्रवाशांना फ्री दोन दिवसांनंतर आणखीन दोन दिवस व्हिजाची मुदत वाढवायची असेल तर त्यांच्याकडून केवळ ५० दिरहम म्हणजेच जवळपास ९३० रुपये आकारले जातील. हे ट्रान्जिट व्हिजा सर्व यूएई एअरपोर्टवर बनवल्या गेलेल्या पासपोर्ट कंट्रोल हॉलमध्ये एक्सप्रेस काऊंटर्सवरून मिळवता येतील. 

ही सुविधा लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. भारतीयांसाठी यूएई सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 

Read More