Marathi News> विश्व
Advertisement

गंज काढायला लागले नऊ महिने; असं आहे तरी काय या 2 हजार वर्ष जुन्या खंजीरमध्ये?

इसवी सनच्या पहिल्या शतकातील हा खंजीर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला असल्याचेही समजते. 

गंज काढायला लागले नऊ महिने; असं आहे तरी काय या 2 हजार वर्ष जुन्या खंजीरमध्ये?

Trending, नवी दिल्ली : इतिहासाचा शोध घेत असताना पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात अनेक प्राचीन आणि अचंबीत करणाऱ्या वस्तु सापडतात. आता जर्मनीत(Germany) असाच एक तब्बल 2 हजार वर्ष जुना खंजीर  शास्त्रज्ञांना( Roman silver dagger) सापडला आहे. हा गंजलेला खंजीर साफ करायला तब्बल नऊ महिले लागले. विशेष म्हणजे हा खंजीर(old ancient dagger) साफ केल्यानंतर तो पुन्हा नवा असल्याप्रमाणे चमकू लागला आहे. हा खंजीर चांदीचा आहे.

एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला 

इसवी सनच्या पहिल्या शतकातील हा खंजीर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला असल्याचेही समजते. इतिहास संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थाला संशोधनादरम्यान हा खंजीर सापडला. 2019 मध्ये जर्मनीत संशोधनादरम्यान हा खंजीर त्याला आढळून आला होता. 

प्राचीन स्मशानभूमीजवळ सापडला खंजीर  

पश्चिम जर्मनीतील मुन्स्टरजवळील हॉलटर्न अॅम सी येथील प्राचीन स्मशानभूमीजवळ हा खंजीर  सापडला. एका जुन्या रोमन लष्करी छावणीजवळ ही स्मशानभूमी होती.  2,000 वर्षांपूर्वी ही स्मशानभूमी येथे बांधली गेली. कालांतराने ही स्मशानभूमी नष्ट होऊन फक्त अवशेष उरले आहेत. मागील दोन शतकांपासून पुरातत्वीय विभागामार्फत येथे सातत्याने संधोशन सुरु आहे. 

खंजीर साफ करायला नऊ महिने लागले

हा खंजीर इतका गंजला होता की त्यावर जाडसर असा थर जमा झाला होता. हा खंजीर साफ करण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले.  अखेरीस हा खंजीर पुन्हा नव्या सारखा चमकू लागला आहे. हा चांदीचा खंजीर असून याची बनावट अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका कुपीत हा खंजीर होता. यावर बारीक नक्षीकाम केल्याचे दिसत आहे. हाच खंजीर एका रोमन सैनिकाने युद्धात शस्त्र म्हणून वापरला होता.    

 

Read More