Marathi News> विश्व
Advertisement

डोंगरावरुन 300 फूट दरीत कोसळली कार, जीवन-मृत्यूशी झुंजणाऱ्या दाम्पत्याचा iPhone 14 ने वाचवला जीव

डोंगरावरुन कार 300 फूट खोल  दरीत कोसळल्याने कारमधलं दाम्पत्य गंभीर जखमी झालं, पण केवळ तंत्रज्ञानामुळे त्यांना वेळेवर मदत मिळाली आणि त्यांचा जीव वाचला

डोंगरावरुन 300 फूट दरीत कोसळली कार, जीवन-मृत्यूशी झुंजणाऱ्या दाम्पत्याचा iPhone 14 ने वाचवला जीव

iPhone 14 satelite : म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी'. पण सध्याच्या युगात जीव वाचवण्यासाठी देवाच्या आशिर्वादाबरोबरच तंत्रज्ञानाचीही मदत मिळाली आहे. याचंच एक उदाहरण समोर आली आहे. एका दाम्पत्याची कार डोंगरावरुन 300 फूट खाली दरीत कोसळली. सुदैवाने कारमधलं दाम्पत्य जीवंत होतं, पण जीवन-मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मोबाईल फोनमुळे त्यांचा जीव वाचला. फोनमधील एका फिचर्समुळे त्यांना तातडीची मदत मिळाली.

iPhone 14 मुळे वाचला जीव
Apple ने तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली आहे. अॅपलचा iPhone वापरणं हा प्रेस्टिज मानला जातो, पण त्याचबरोबर या फोनमधलं तंत्रज्ञानही आधुनिक आहे. iPhone चं लेस्टेट व्हर्जन असलेल्या iPhone 14 मध्ये एका नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिचर्समुळेच त्या दाम्पत्याचा जीव वाचला. अमेरिकेत घडलेल्या या घटनेची सर्वत चर्चा सुरु आहे. 

Satellite SOS feature
iPhone 14 सीरिजमध्ये क्रॅश डिटेक्शन फिचरचा समावेश करण्यात आला आहे. तुमच्या कारचा अपघात किंवा एखादी दुर्घटना घडली की हे फिचर्स सक्रीय होतं. या फिचर्समाध्यमातून तातडीच्या नंबरवर मेसेज जातो आणि मदतीसाठी आव्हान केलं जातं. या फिचर्सला सॅटेलाईट एसओएस फिचर असं म्हटलं जातं. अपघातावेळी दाम्पत्य गंभीर जखमी झालं होतं, त्यामुळे ते कोणचीही मदत मागण्याच्या अवस्थेत ते नव्हते. पण SOS फिचर्समुळे त्यांना तातडीची मदत मिळाली आणि त्यांचा जीव वाचला. 

हे ही वाचा : किती ते माबोईलचं वेड, तब्बल तीन दिवस डोंगरावरील कपारीत अडकला, वाचा नेमकं काय झालं

iPhone 14 ची वैशिष्ट्य
आयफोन 14 चे चार प्रकार आहेत. iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Pro. आयफोन 14 च्या चारही मॉडेल्समध्ये OLED डिस्प्लेचे दोन प्रकार देण्यात आले आहेत. iPhone 14 चा डिस्प्ले 6.1-इंचाचा आणि iPhone 14 Max चा डिस्प्ले 6.9-इंचाचा आहे. Phone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max LTPO OLED डिस्प्लेसह येतात. या दोन मॉडेल्समध्ये व्हेरिएबल रिफ्रेश रेट (VRR) फीचर आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर देखील आहेत.

Read More