Marathi News> विश्व
Advertisement

चौफेर टीकेनंतर चीनला या देशाची साथ, एकत्र बनवणार कोरोनावर लस

कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जगभरातून चीनवर टीका होत आहे.

चौफेर टीकेनंतर चीनला या देशाची साथ, एकत्र बनवणार कोरोनावर लस

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जगभरातून चीनवर टीका होत आहे. चीनने कोरोनाबाबतची खरी माहिती जगाला सांगितली नाही, असा आरोपही चीनवर होत आहे. एकीकडे चीन आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतानाच एक देश चीनच्या मदतीला धावला आहे. चीनसोबत कोरोना व्हायरसवर लस बनवण्याची इच्छा या देशाने व्यक्त केली आहे.

कॅनडाच्या नॅशनल काऊन्सिलने कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी चीनसोबत हातमिळवणी केली आहे. चीनची कंपनी आणि कॅनडाने संयुक्तपद्धतीने तयार केलेल्या Ad5-nCoV लसीचे प्रयोग कॅनडामध्ये होणार आहेत. 

Ad5-nCoV ही लस सगळ्यात जलद तयार करण्यात आली आहे. या लसीचा आणखी विकास करण्यासाठी चीनने करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये लसीचं मानवावर परीक्षण करण्यापासून ते लस तयार करण्यापर्यंतचा समावेश आहे. 

'आम्ही कॅनडामध्ये या लसीचं मूल्यांकन करणार आहोत. लस किती सुरक्षित आणि प्रभावित आहे, ते आम्ही पाहणार आहोत. चीनमध्ये हे प्रयोग आधीपासूनच सुरू आहेत,' असं एनआरसीच्या लाईफ सायन्सचे उपाध्यक्ष रोमन सुजमस्की म्हणाले. 

लसीचे प्रयोग यशस्वी झाले तर लवकपच आपत्कालिन उपयोगासाठी याला कॅनडामध्ये मंजुरी देण्यात येईल. चीनमध्ये ही लस मानवी प्रयोगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहे. 

कोरोना आणि हुवाईच्या प्रकरणावरून चीन आणि कॅनडातले संबंध ताणले गेले होते. कॅनडा हुवाईच्या ५ जी पायाभूत सुविधांना परवानगी देणार का नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. फेब्रुवारी महिन्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कॅनडाच्या लष्कराने ट्रुडो यांना हुवाईच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. कॅनडामध्ये १ लाखांच्यावर नागरिकांनी सही करून हुवाईवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.

Read More