Marathi News> विश्व
Advertisement

चोरावर मोर! पळून जाताना असा फसला डाव, Video पाहून तुम्हीही म्हणाल अद्दल घडली

चोरीच्या अनेक घटनांमध्ये चोरांना घटनास्थळीच अद्दल घडते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चोरानं चोरी केली खरी पण त्याचा प्लान फसला.

चोरावर मोर! पळून जाताना असा फसला डाव, Video पाहून तुम्हीही म्हणाल अद्दल घडली

Thief Knocks Himself After Running Into Glass Door: संपूर्ण जगभर अनेक चोरीच्या घटना घडतात. काही गुन्ह्यांच्या छडा लागतो. तर काही चोर पकडणं कठीण होतं. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे. चोरीची घटना घडली तरी गुन्ह्याची उकल करणं सोपं होतं. चोरीच्या अनेक घटनांमध्ये चोरांना घटनास्थळीच अद्दल घडते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चोरानं चोरी केली खरी पण त्याचा प्लान फसला. पळून जाताना भानच राहील नाही आणि काचेवर जाऊन आपटला आणि बेशुद्ध झाला. 

अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील बेलेव्ह्यू येथे ही घटना घडली. लुई व्हिटॉन स्टोअरमध्ये (Louis Vuitton Store) चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय चोर लुई व्हिटॉन स्टोअरमधून दिवसाढवळ्या 1.46 लाख किमतीची हँडबॅग घेऊन पळत होता. पण त्याचा प्रयत्न फसला आणि दार उघडं असल्याचं समजून त्यावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की, तो जागच्या जागीच बेशुद्ध पडला. 

सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोपीचे नाव जाहीर करण्यात आले नाही कारण तो अल्पवयीन होता. यापूर्वी अंगठी चोरीच्या त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे, परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यवसायाने चिंता व्यक्त केली आहे. व्यवसाय मालकांनी सांगितले की, लुई व्हिटॉन सारख्या शोरूमना चोरट्यांनी लक्ष्य करत आहेत. 

Read More