Marathi News> विश्व
Advertisement

जुळी मुलं झाली, एकाचा जन्म २०२१ मध्ये आणि एकाचा २०२२ मध्ये

गोलमाल है भाई सब गोलमाल है... 

जुळी मुलं झाली, एकाचा जन्म २०२१ मध्ये आणि एकाचा २०२२ मध्ये

कॅलिफोर्निया : जुळी मुलं म्हटलं की, त्यांच्या कपड्यांपासून ते अगदी खेळण्यांपर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य पाहायला मिळतं. फक्त चेहरेपट्टीच नव्हे, तर आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आणि इतरही गोष्टी ही मुलं वाटून घेत असतात. अगदी त्यांची जन्मतारीखही एकसारखीच असते. 

तुम्हाला माहितीये का, कॅलिफोर्नियातील एका महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला. पण, यामध्ये 15 मिनिटांचं अंतर होतं. 

परिणामी तिच्या दोन्ही मुलांच्या जन्माची नोंद वेगळ्या दिवसांना झाली. 

Fatima Madrigal नावाच्या महिलेनं अलफ्रेडो या मुलाला 11.45 वाजता जन्म दिला. तर त्याच्या जुळ्या बहिणीचा जन्म मध्यरात्री 12 च्या ठोक्याला झाला. 

आपल्या जुळ्या मुलांचे वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी असणं अतिशय भारावणारं आहे, असंच Fatima Madrigal म्हणाल्या. 

 '1 in a 2 million chance' असा उल्लेख करत रुग्णालयानंही या लहानग्यांच्या जन्माचा जल्लोष केला. 

नव्या वर्षाच्या मध्यरात्री Aylin Yolanda Trujillo  हिचा जन्म झाला. त्याच्या पंधरा मिनिटांपूर्वीच Alfredo Antonio Trujillo याचा जन्म झाला होता. 

भावाचा जन्म 2021 मध्ये तर बहिणीचा जन्म 2022 मध्ये होणं हा एक दुर्मिळ योग असल्याचीच प्रतिक्रिया रुग्णालयातूनही व्यक्त करण्यात आली. 

आता Fatima Madrigal आणि Robert Trujillo या जोडीला एकूण तीन मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा.

fallbacks

सहसा जुळी मुलं पण, वाढदिवस वेगवेगळे असा योग फारच कमी पाहायला मिळतो. पण, इथं मात्र याचंच एक भन्नाट उदाहरण पाहायला मिळत आहे. 

कॅलिफोर्निया आणि नजीकच्या परिसरामध्ये याच मुलांची आणि त्यांच्या जन्माची कहाणी सर्वांच्या नजरा वळवत आहे. 

Read More