Marathi News> विश्व
Advertisement

घरातील ही झाडं तुम्हाला करणार धनवान, लावून तर बघा खोऱ्याने पैसा ओढाल

मालामाल करणार ही दोन झाडं, फक्त काळजी घेणं तुमचं काम 

घरातील ही झाडं तुम्हाला करणार धनवान, लावून तर बघा खोऱ्याने पैसा ओढाल

मुंबई : झाडे आणि वनस्पती केवळ आपल्या सभोवतालच्या वातावरणावरच नव्हे तर आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर, घरातील सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा, अगदी नातेसंबंधांवर होतो. त्यामुळेच वास्तुशास्त्रात झाडांना आणि वनस्पतींना खूप महत्त्व देण्यात आले आहे.

आज आपण अशाच 2 खास झाडांबद्दल जाणून घेऊया, त्यांची लागवड केल्याने घरात पैशांचा पाऊस पडतो. आर्थिक स्थितीसाठी ही झाडे अतिशय शुभ आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, अब्जाधीशांनीही आपल्या घरात ही खास झाडे लावली आहेत.

मनी ट्री 

क्रॅसुला प्लांट पैशाच्या दृष्टीने इतका शुभ मानला जातो की त्याचे नावच मनी ट्री असे ठेवले गेले. ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसे आकर्षित करते. त्यामुळे काही दिवसांत आर्थिक स्थितीत मोठा फरक पडतो. ही वनस्पती घरामध्ये किंवा घराबाहेर कुठेही लावता येते. फक्त पूर्व आणि पश्चिम दिशेला लावणे टाळा. सर्वोत्तम परिणामांसाठी ते जमिनीत लावा.

अशोकाचे झाड 

अशोकाचे झाड खूप शुभ मानले जाते. या झाडामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते. हे झाड लावल्याने सर्व समस्या दूर होतात. अशोकाचे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करते, ज्यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात. हे झाडं लावताना फक्त लक्षात ठेवा की त्याची उंची आपल्या घरापेक्षा जास्त नसावी. झाडाची सावली पडणे चांगले नाही.

दुसरीकडे, व्यवसायात झपाट्याने वाढ होण्यासाठी, अशोकाचे रोप लाल कापडात बांधून ठेवा आणि जिथे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवता तेथून ठेवा. फरक स्पष्टपणे दिसून येईल.

Read More