Marathi News> विश्व
Advertisement

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; डेल्टा वेरिएंट ठरतोय जबाबदार

डेल्टाचा लहान मुलांना देखील याचा धोका असल्याचं समोर आलं आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; डेल्टा वेरिएंट ठरतोय जबाबदार

वॉशिंटग्टन: अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटमुळे नागरिकांना संक्रमण होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येतेय. दरम्यान यामध्ये लहान मुलांना देखील याचा धोका असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अमेरिकेतील रूग्णालयांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रणाणे, हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे होताना दिसतंयय. कारण ते अल्फा स्ट्रेनपेक्षा मुलांना अधिक संक्रमित करतं.

कमी लसीकरणामुळे समस्येत होतेय वाढ

हा कल विशेषतः अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये समोर आला आहे. कमी लसीकरण असलेल्या भागात कोविड 19 ची लागण झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची संख्या अधिक दिसून येत आहे. "जुलैच्या सुरुवातीपासून, आम्ही प्रकरणांच्या संख्येत सातत्याने वाढ पाहिली आहे आणि आम्ही रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्येही वाढ पाहिलीये" असं टेक्सास चिल्ड्रेन हॉस्पिटलमधील बालरोगतज्ञ डॉ. जेम्स वर्सालोविक यांनी सांगितलं आहे.

डेल्टा वेरिएंटमुळे प्रकरणांमध्ये होतेय वाढ

डॉ. जेम्स वर्सालोविक यांच्या सांगण्यानुसार, याठिकाणी याला चौथी लाट मानली जातेय आणि हे सर्व डेल्टा वेरिएंटमुळे होतंय. डेल्टा वेरिएंट हा आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनपैकी अधिक संक्रामित करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या 90 टक्के लहान मुलांमध्ये डेल्टा वेरिएंट पहायला मिळाला.

12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना लस नाही

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तविकता अशी आहे की 12 वर्षांखालील मुलांसाठी अद्याप कोणतीही लस नाही. 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केलं जातंय, परंतु अनेकांना अद्याप लस दिलेली नाही. या भागात अजूनही 50 टक्क्यांपेक्षा कमी तरुण आहेत ज्यांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, फ्लोरिडामध्ये सलग आठ दिवस मुलं रुग्णालयात दाखल होत होती. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट आहे. हे अशा वेळी घडत आहे जेव्हा टेक्सास आणि फ्लोरिडामधील बहुतेक विद्यार्थी या महिन्यात शाळेत जात आहेत. दरम्यान, काही शाळा मुलांसाठी मास्क आवश्यक आहेत की नाही यावर मतभेद सुरु आहेत

Read More