Marathi News> विश्व
Advertisement

Youtube वर सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला? तुम्हाला उत्तर माहितीये का?

First Youtube Video: जगातील पहिला वाहिला युट्यूब व्हिडिओ कोणता, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का. तर इथे पाहा जगातील पहिला युट्यूब व्हिडिओ

 Youtube वर सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला? तुम्हाला उत्तर माहितीये का?

First Youtube Video: स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात माणूसही फास्ट अपडेट होत आहे. आज सोशल मीडियाचे (Social Media) माध्यमही कमाईचे साधन झाले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबच्या (Youtube) माध्यामातून लोक बक्कळ कमाई करु लागले आहेत. अनेकदा साध्या साध्या गोष्टींसाठीही युट्युबची मदत घेऊ लागली आहेत. खरं तर युट्यूब आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. पण तुम्हाला माहितीये का युट्यूबवर अपलोड करण्यात आलेला पहिला व्हिडिओ कोणता आहे आणि कोणत्या साली अपलोड करण्यात आल्या. आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट फॅक्ट्स सांगणार आहोत. (Youtube First Video)

आज युट्यूबची मदत घेऊन आपण सहज आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी हाताळू शकतो. किचनमध्ये काम करत असताना एखादी रेसिपी माहिती नसेल तरीही आपण लगेचच युट्यूब सुरू करुन रेसिपीचा व्हिडिओ पाहतो. अनेक गोष्टी आज युट्यूबवरुन शिकता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला युट्यूबच्या पहिल्या व्हिडिओबद्दल माहिती करुन देणार आहोत. 

युट्यूबवर पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005मध्ये रात्री 8 वाजून २७ मिनिटांनी अपलोड करण्यात आला होता. जावेद करीम नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. मी प्राणीसंग्रहालयात (Me At The Zoo) या नावाने अपलोड करण्यात आले आहे. जावेद करीम हा सॅन डिएगो झूमध्ये फिरण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांने झूमध्ये असलेल्या हात्तींबाबत प्राथमिक माहिती दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. तुम्ही अजूनही जावेद युट्यूब या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. फक्त 19 सेंकदाचा हा व्हिडिओ असून 281 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आले आहेत. 

दरम्यान, 14 फेब्रुवारी 2005मध्ये युट्यूब लाँच करण्यात आलं होतं. हळहळू आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झाले आहे. आज लोक या माध्यमातून तगडी कमाई करत आहेत. आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनेल हे T Series आहे. या चॅनेलला 246 सब्सक्राइब आहेत. आज युट्यूबवर प्रती मिनिट 500 तासांचा कंटेट अपलोड होतात. युट्यूबचा फ्री आणि पेड व्हर्जनदेखील उपलब्ध आहे. पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला ADs फ्री कंटेट उपलब्ध होतो. 

Read More