Marathi News> विश्व
Advertisement

Suez Canal: इजिप्तच्या पहिल्या महिला कॅप्‍टन Marwa Elselehdar वर सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप

इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये 'एव्हर गिव्हन' नावाचे प्रचंड मोठे मालवाहतूक करणारे जहाज आडवे अडकल्यानंतर सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंना कोंडी झाली होती.

Suez Canal: इजिप्तच्या पहिल्या महिला कॅप्‍टन Marwa Elselehdar वर सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप

इजिप्त: इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये 'एव्हर गिव्हन' नावाचे प्रचंड मोठे मालवाहतूक करणारे जहाज आडवे अडकल्यानंतर सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंना कोंडी झाली होती. तसेच या जहाजात 9.6 अब्ज डॅालरचा मालही अडकून पडला होता. तेव्हा 350 हून अधिक मालवाहू जहाज अडकले होते. त्यावेळी त्यांना माल वाहतूक करण्यासाठी लांब पल्ल्याचा मार्ग स्वीकारावा लागला, ज्यामुळे माल वाहतुकीसाठी जहाजांना हजारो डॅालर्सचे नुकसान सहन करावे लागले.

या सगळ्यामुळे इजिप्त या देशाची पहिली महिला जहाज कॅप्टन मारवा सीलेहदारच्या (Marwa Elselehdar)  अडचणी वाढल्या. कारण तिला या घटनेसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. परंतु जेव्हा ही घटना घडली त्यावेळी, ती शेकडो मैलांच्या अंतरावर असलेल्या अलेक्झांड्रियामधील ‘आयडा-फोर’ नावाच्या जहाजामध्ये कार्यरत होती.

खोट्या बातम्यांमुळे मारवा अस्वस्थ

'एव्हर गिव्हन' सुएझ कालव्यात अडकल्यानंतर, मारवा सीलेहदार (Marwa Elselehdar) बद्दल खोट्या बातम्या येण्यास सुरवात झाली आणि काही स्क्रीनशॉट्स शेअर केले गेले. या गोष्टीमुळे मारवाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. कारण मारवाचे फोटो ऍडीट करुन खोट्या पद्धतीने सोशल मीडियावर शेअर केले जात होते.

मारवा सीलेहदारने (Marwa Elselehdar) मांडली आपली वेदना

बीबीसीशी (BBC) बोलताना मारवा सीलेहदारने (Marwa Elselehdar) आपली व्यथा मांडली आणि सांगितले की, "ही अफवा कोणी तरी मुद्दाम पसरवली आहे. परंतु कोणी असे का करेल? याचे कारण मला ही माहित नाही." पुढे ती म्हणाली, "मला वाटले की, या क्षेत्रात मी एक यशस्वी महिला, आणि इजिप्तची असल्याने मला टार्गेट केले गेले असावे. परंतु खरे कारण मलाही सांगता येणार नाही.

Read More