Marathi News> विश्व
Advertisement

मांजरीचा पायलटवर हल्ला, विमानाची अखेर Emergency Landing

 अवघ्या दीड तासात पायलटला विमान खाली घतरवून घ्यावे लागले.

मांजरीचा पायलटवर हल्ला, विमानाची अखेर Emergency Landing

खार्तूम : खराब हवामानामुळे विमानाची एमर्जन्सी लँन्डिंग करावी लागली अशा बातम्या बहुदा कानावर येत असतात. पण सुदानची राजधानी खार्तुममध्ये एक विचित्र घटना घडली. कारण आकाशात झेपावलेल्या विमानाच्या कॉकपीटमध्ये एका मांजरीने थेट पायलटवरच हल्ला चढवला. या घटनेमुळे अवघ्या दीड तासात पायलटला विमान खाली घतरवून घ्यावे लागले. या विमानाचं Emergency Landing देखील थेट एक्स्प्रेस वे वर करण्यात आलं.

ही मांजर सतत विमानात गोंधळ घालत होती, प्रवाशांनी तिला शांत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही आणि अखेर विमानाचं Emergency Landing करावं लागलं, असं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

खार्तूम येथून आकाशात झेपावले होते, प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूदानच्या तारको एयरलाइनचे विमान हे कतारची राजधानी दोहा या शहरात जात होते. दरम्यान मांजराच्या हल्ल्यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. अनेक प्रवासी मांजराचे रोद्ररुप पाहून घाबरले होते. असे असले तरी ,सुरक्षाव्यवस्थेला भेदून ती मांजर विमानात पोहचलीच कशी.

विमानतऴावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मते विमानात साफ-सफाईचे काम केले जात होते. त्या दरम्यान ती मांजर आतमध्ये ये्ऊन बसली असावी. 

Read More