Marathi News> विश्व
Advertisement

पाकिस्तान सोबत जवळीक आणि काश्मीरचा डाव ट्रम्प यांना महागात पडेल?

पाकिस्तानी नेत्यांना खोटारडे म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं स्वागत करताना दिसले.

पाकिस्तान सोबत जवळीक आणि काश्मीरचा डाव ट्रम्प यांना महागात पडेल?

मुंबई : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी नेत्यांना खोटारडे म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं स्वागत करताना दिसले. ट्रम्प हे पाकिस्तान सोबत संबंध चांगले व्हावेत याबाबत बोलताना दिसले. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित झाली तर अमेरिकेचं सैन्य पुन्हा मागे घेण्याबाबची आशाही वर्तवली.

अमेरिकेतील वर्तमानपत्र फॉरेन पॉलिसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अज्ञान असल्याचा परिचय दिला. ट्रम्प अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या मदतीची वकिली करताना ते काश्मीर मुद्द्यामध्ये घुसले.  काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनी याबाबत मध्यस्थता करण्यासाठी प्रस्ताव दिल्याचं सांगत त्यांनी भारताची नाराजी ओढवून घेतली. दुसरीकडे ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत पुन्हा एकदा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

भारताने लगेचच यावर त्यांना उत्तर दिलं. भारताचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा कोणताच प्रस्ताव अमेरिकेच्य़ा राष्ट्राध्यक्षांपुढे ठेवला नाही. भारत आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पाकिस्तानसोबत सर्व मुद्द्यांवर द्विपक्षीय स्तरावरच चर्चा होईल.'

यूएस अधिकाऱ्यांनी मागच्या २० वर्षात अनेकदा काश्मीरच्या मुद्दयात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचं म्हणणं आहे की, भारत-पाकिस्तानमधील काश्मीर मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित होत नाही आहे. पाकिस्तानला वाटतं की, अफगाणिस्तानमध्ये भारताचं वर्चस्व कमी करण्यासाठी तालिबानला मदत करणं गरजेचं आहे.

कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे अभ्यासकांना वाटतं की, 'भारत-पाकिस्तानमधील वाद संपला तर अफगाणिस्तानमधील अंतर्गत वाद देखील संपेल. ज्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना देणारी मदत बंद करेल. पण भारताने काश्मीर मुद्दा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवण्यासाठी नकार दिला आहे. भारताची आजही हीच भूमिका आहे की, काश्मीर हा त्यांचाच आहे. यावर कोणाचीही मध्यस्थिची गरज नाही.'

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार ब्रॅड शेरमन यांनी ट्विट करत म्हटलं की, 'जो कोणीही दक्षिण आशियामधील परराष्ट्र नीतींचा अभ्यास करतो. त्याला माहित आहे की, भारताने आतापर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावर कोणत्याही तिसऱ्या देशाला मध्यस्थी करण्यासाठी नकार दिला आहे. सगळ्यांना माहित आहे की, पीएम मोदी कधीच असा प्रस्ताव ठेवणार नाहीत. ट्रम्प यांचं वक्तव्य चुकीचं आणि लाज काढणारं आहे.' त्यांनी ट्विट करत याबाबत अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्ष श्रृंगला यांची माफी देखील मागितली आहे. 

एरिस यांनी म्हटलं की, 'सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीची काहीच गरज नाही. पाकिस्तान नेहमी मध्यस्थीची मागणी करतो आणि भारताचा याला विरोध आहे.'

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध काही दिवसांपूर्वी बिघडले होते. जानेवारी २०१८ ला ट्रम्प यांना ट्विट करुन पाकिस्तानला सुनावलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तानी नेते अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना मुर्ख बनवतात. दहशतवाद्यांना देशात स्थान देतात. अमेरिका मुर्खासारखी पाकिस्तानला ३३ अरब डॉलरची मदत करतो.' यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी मदत देखील रोखली होती. 

सोमवारी मात्र ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली. ट्रम्प यांनी म्हटलं की, 'पाकिस्तान कधीही खोटं नाही बोलत. सोबतच सुरक्षेसाठी अरबो डॉलरची ऑफर देखील केली. हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. पण आम्ही काम कसे करतो यावर हे अवलंबून आहे.'

अमेरिका एकीकडे तालिबानला संपवण्याची भाषा करतो आणि दुसरीकडे त्यांनाच मदत करणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक मदतही देतो. ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने तर त्यांच्याच देशातील संरक्षण विभागाचे अधिकारी देखील हैराण झाले. ट्रम्प यांनी म्हटलं की, मी एका आठवड्यात ही लढाई जिंकू शकतो. पण मला करोडो लोकांना मारायचं नाही.' पण ट्रम्प हे विसरले की, ओसाम बिन लादेनच्या विरोधात अफगाणिस्ताननेच त्यांना मदत केली होती. 

तालिबानला अफगाणिस्तानचं सरकार मान्य नाही. अमेरिकेला आशा आहे की, पाकिस्तान तालिबानसोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला मदत करेल. 

इम्रान खान यांनी व्हाईट हाऊलमध्ये म्हटलं की, 'अफगानिस्तानमध्ये शांती वार्तासाठी आम्ही खूप जवळ पोहोचलो आहोत. आम्हाला आशा आहे की, तालिबाननला आम्ही सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार करु.'

राजकीय विश्लेषक आरिफ रफीक म्हणतात की, 'वॉशिंगटन तालिबानवर इस्लामाबादचा किती प्रभाव आहे. याचा अभ्यास करतो आहे. पण अमेरिकेच्या हाती निराशा लागू शकते. पण ट्रम्प यांनी म्हटलं की, पाकिस्तान एक मोठा देश असून महत्त्वाचा देश आहे. पण अमेरिकेला यासाठी पाकिस्तान सोबतचे संबंध पुन्हा एकदा सुधारावे लागतील आणि बिजिंगचा त्यांच्यावरचा प्रभाव कमी करावा लागेल.

Read More