Marathi News> विश्व
Advertisement

'आळशी लोकांना कामाची संधी'.... सोशल मीडीयावर 'ही' पोस्ट घालतेय धुमाकूळ

खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात लिहिली गेली आहे. परंतु त्याच्या पुढे जे लिहिलंय ते मजेदार आहे.

'आळशी लोकांना कामाची संधी'.... सोशल मीडीयावर 'ही' पोस्ट घालतेय धुमाकूळ

मुंबई : सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो एका नोकरीच्या जाहिरातीचा आहे. या फोटोमध्ये अशा दोन अटी आहेत ज्या पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तसे पाहाता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जवळ-जवळ सगळ्याच गोष्टी आपल्याला आश्चर्यचकीत करतात. परंतु या जाहिरातीच्या फोटोने तर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात लिहिली गेली आहे. परंतु त्याच्या पुढे जे लिहिलंय ते मजेदार आहे. यांनी लिहिलंय की, आमच्या सध्याच्या कर्मचार्‍यांशी ताळमेळ राखण्यासाठी आम्हाला आळशी आणि दु:खी लोकांची गरज आहे. तुमच्या CV सोबत वैयक्तिकरित्या अर्ज करा आणि येताना अंघोळ करुन या.

तुम्हाला यावर कदाचित विश्वास बसत नसावा, परंतु हा फोटो पाहा तुम्हाला सगळं लक्षात येईल.

हा फोटो पाहून लोक अश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांना यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. लोकांनी ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर केली आहे आणि ''तुझ्यासाठी जॉब मिळाला'' असं सांगून त्यांना टॅग देखील केलं आहे.

हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत सहा हजारांहून अधिक लोकांनी या जाहिरातीला लाईक केले आहे आणि 400 हून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे.

Read More