Marathi News> विश्व
Advertisement

Winter Solstice: उद्याचा सर्वात लहान दिवस; इतक्या लवकर अंधार पडणार की...

Shortest Day of the Year: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आता थंडीलाही जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे (shortest day) यंदाही थंडीच्या काळात दिवस मोठा पाहायला मिळणार आहे. याचा पहिला दिवस हा उद्या म्हणजे 22 डिसेंबरला (22 December) असणार आहे. 

Winter Solstice: उद्याचा सर्वात लहान दिवस; इतक्या लवकर अंधार पडणार की...

Shortest Day of the Year: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आता थंडीलाही जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे (shortest day) यंदाही थंडीच्या काळात दिवस मोठा पाहायला मिळणार आहे. याचा पहिला दिवस हा उद्या म्हणजे 22 डिसेंबरला (22 December) असणार आहे. यावेळी दिवस लहान आणि रात्रं मोठी असणार आहे, त्यामुळे हा दिवस उद्याचा सर्वात लहान दिवस असणार आहे. आकाशातल्या खगोलीय घटना आपल्याला कायमच आकर्षित करतात. दिवस, रात्र, ग्रहण, तारे अशांच्या खगोलीय घटनांकडे आपण एक खगोलप्रेमी (astronomy news) म्हणूनही कायमच लक्ष ठेवून असतो. 22 डिसेंबर रोजी होणारी ही अद्भुत खगोलीय घटना उज्जैन आणि जयपूरसह देशभरातील वेधशाळांमध्ये थेट पाहता येईल. 

सध्या अशीच एक घटना घडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या या वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आपल्या पृथ्वीवासियांना अनुभवायला मिळणार आहे. या दरम्यान दिवसाचा एकूण कालावधी फक्त 10 तास 41 मिनिटे असेल आणि रात्रीचा एकूण कालावधी 13 तास 19 मिनिटे असेल. (shortest day of the year 2022 tommorrow will be the short day of 11 hours)

काय आहे विंटर सोलिस्ट्सचं (Winter Solstices) महत्त्व? 

हा एक लॅटिन शब्द आहे. सोलिस म्हणजे सूर्य आणि टिस्ट म्हणजे स्थिरं उभं राहणं. या दिवशी हिवाळ्यात सूर्य स्थिर उभा राहतो. या दिवशी पृथ्वी झुकलेल्या अक्षावर फिरते. उद्या सूर्य हा कर्कवृत्ताकडे म्हणजे उत्तरायण ते दक्षिणायनपर्यंत येणार आहे. या दिवसापासून देशातील अनेक मैदानी भागात थंडी जाणवेल तर डोंगराळ भागात जोरात बर्फवृट्टी होईल. या काळात उत्तर ध्रुवावर (North Pole) रात्र असते आणि दक्षिण ध्रुवावर (South Pole) सकाळ असते. उद्या आपल्याला अशी खगोलीय घटना पाहायला मिळेल. 

काय आहे उद्याचं स्पेशल कारण? 

खगोलतज्ञांच्या मते, पृथ्वीच्या सुर्याभोवती प्रदक्षिणा झाल्यामुळे 22 डिसेंबर रोजी सुर्य मकर राशीवर असेल. उत्तर गोलार्धात या गोष्टीमुळे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी देशातील विविध शहरांमध्ये सकाळी 6.55 ते 7.00 या वेळेत सुर्योदय होणार आहे. राजस्थानांच्या शहरांमध्ये सुर्यादय 7.12 वाजता होईल तर सूर्यास्त 5.39 वाजता होईल, म्हणजेच हा दिवस 10 तास 27 मिनिटांचा असेल. काही शहरात सुर्याेदय 7.5 वाजता असेल तर सूर्यास्त संध्याकाळी 5.46 वाजता होईल.  

Read More