Marathi News> विश्व
Advertisement

थिएटर ग्रुपवर हल्ला : एकाला देहदंडाची शिक्षा तर इतर दोघांना साडे बारा वर्षांची शिक्षा

थिएटर ग्रुप आपलं सादरीकरण करत असतानाच हा हल्ला घडवून आणण्यात आला होता

थिएटर ग्रुपवर हल्ला : एकाला देहदंडाची शिक्षा तर इतर दोघांना साडे बारा वर्षांची शिक्षा

रियाद : सौदी अरब न्यायालयानं रियादमध्ये एका स्पॅनिश थिएटर ग्रुपवर हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर निर्णय सुनावलाय. या हल्लेखोराला न्यायालयानं देहदंडाची शिक्षा ठोठावलीय. सरकार संचालित अल-एखबारिया चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरबच्या पॅनल कोर्टानं नोव्हेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यात एकाला देहदंडाची तर इतर दोघांना साडे बारा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. 

१९ डिसेंबर रोजी सुरु झालेल्या ट्रायल दरम्यान देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीवर दहशतवादी कारवाया तसेच अवकाश कार्यक्रमाचं सेलिब्रेशन रोखण्याचा प्रयत्न करण्याचाही आरोप लावण्यात आलाय. 

अल एखबारियानं दिलेल्या माहितीनुसार, दोषी व्यक्ती यमनचा रहिवासी आहे. त्यानं तीन कलाकारांवर चाकूनं वार करत त्यांना जखमी केलं होतं. हा हल्ला अरब द्वीपमध्ये यमनमधल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या आदेशानंतर करण्यात आला होता. 

सौदी अधिकाऱ्यांद्वारे एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किंग अब्दुल्लाह पार्कमध्ये या कार्यक्रमासाठी मोठा जमावही जमला होता. परंतु, थिएटर ग्रुप आपलं सादरीकरण करत असतानाच हा हल्ला घडवून आणण्यात आला होता.  

Read More