Marathi News> विश्व
Advertisement

R9X hellfire Missile अमेरिकेचं अत्यंत घातक हत्यार, ज्याने जवाहिरीला धाडलं यमसदनी; जाणून घेऊया त्याची खासियत

जाणून घेऊया त्याची खासियत  

R9X hellfire Missile अमेरिकेचं अत्यंत घातक हत्यार, ज्याने जवाहिरीला धाडलं यमसदनी; जाणून घेऊया त्याची खासियत

Ayman al Zawahiri killed : अमेरिकेने अयमान अल जवाहिरीचा खात्मा करण्यासाठी खास R9X Missile चा वापर केला. हे आतापर्यंतचं अत्याधुनिक हत्यार मानलं जातं. याची खासियत म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोट होत नाही. जवाहिरीच्या घराच्या आसपासचे जे फोटो आता समोर आले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्फोटाची चिन्ह दिसत नाहीत.

R9X hellfire Missile ची खासियत म्हणजे जे एक वॉरहेड लेस मिसाईल आहे. या मिसाईलमधून लहान टार्गेटवर अचूक निशाणा साधता येतो. या मिसाईलला निंजा मिसाईल देखील बोललं जातं. अमेरिकेतील अधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात इतर कुणालाही हानी पोहोचलेली नाही.  

R9X hellfire Missile हे जगभरातील सोफिस्टिकेटेड मिसाईल पैकी एक मिसाईल आहे. आपलं टार्गेट अचूक गाठणं आणि ते नेस्तनाबूत करणं ही या मिसाईलची खासियत आहे. या मिसाईलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा दारुगोळा भरला जात नाही. या मिसाईलमधून चाकूसारखे ब्लेड्स निघतातत. या ब्लेड्समध्ये कुणालाही कापून टाकण्याची क्षमता असते. जवाहिरीचा जीवही याच घातक ब्लेड्सनी घेतला आहे.

R9X hellfire Missile मध्ये इनबिल्ट सेन्सर्स असतात. हे सेन्सर्स केवळ आपल्या टार्गेटला निशाणा बनवतात. या मिसाईलमध्ये लेझर्स लावलेले असतात. ज्या क्षणी हे मिसाईल आपल्या टार्गेटवर पडतं, त्यानंतर यापासून वाचणं जवळपास अशक्य असतं.

बाराक ओबामा यांच्या कार्यकाळात म्हणजे 2011 मध्ये R9X hellfire Missile ला डेव्हलप केलं गेलं. याचा वापर पहिल्यांदा 2017 मध्ये तैनात केलं गेलेलं. अमेरिकेने याच मिसाईलने अल कायदाचा दहशतवादी अबू अल खैर अल मसरी याचा याच मिसाईलने खात्मा केलेला. 

Read More