Marathi News> विश्व
Advertisement

King Charles III : किंग चार्ल्स III सिंहासन सोडणार; 400 वर्षांपूर्वीची ती' भविष्यवाणी खरी ठरणार?

 King Charles III नव्हे, तर कोण असेल नवा राजा?   

King Charles III : किंग चार्ल्स III सिंहासन सोडणार; 400 वर्षांपूर्वीची ती' भविष्यवाणी खरी ठरणार?

Nostradamus About King Charles: राणी एलिझाबेझ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. ज्यानंतर त्यांच्या सिंहासनाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे सोपवण्यात आले. त्या क्षणापासून संपूर्ण जगानं Long live the King असं म्हणत चार्ल्स यांचा उल्लेख किंग चार्ल्स III म्हणून करण्यास सुरुवात केली. तिथे चार्ल्स यांच्या या नव्या प्रवासाची सुरुवातही झाली नाही, तोवर त्यांच्याविषयीच्या अनेक संमिश्र चर्चा पाहायला मिळत आहेत. 

चार्ल्स यांच्याविषयी एक अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे, जे ऐकून तेसुद्धा चिंतेत येऊ शकतात. ही भविष्यवाणी केलीये फ्रान्समधील (France) ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक नॉस्‍त्रेदमस यांनी. 

नॉस्‍त्रेदमस यांच्या मते किंग चार्ल्स सिंहासनाचा त्याग करतील आणि त्यांना एखादी नवी जबाबदारी मिळेल. 1955 मध्ये नॉस्‍त्रेदमस यांची ही भविष्यवाणी समोर आली होती की राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन 94 व्या वर्षी होईल. ज्यानंतर आता त्यांनी किंग चार्ल्स यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी सर्वांच्या नजरा वळवतेय. (Queen Elizabeth II son french prophet Nostradamus Shocking Predictions About King Charles III )

पाहा : 'This Bloody thing...' म्हणणाऱ्या King Charles III यांचं संतप्त रुप पहिल्यांदाच जगासमोर; Video Viral

 

2005 मध्ये मारियो रिडींग यांच्या एका पुस्तकात नॉस्‍त्रेदमस यांच्याविषयी बरेच दावे करण्यात आले होते. त्यामध्ये उल्लेख केल्यानुसार चार्ल्स यांना वयाच्या 74 व्या वर्षी ब्रिटनच्या सिंहासनाचे अधिकार मिळतील जे मिळालेही. पण, यापुढे त्यांनी असाही उल्लेख केला की काही दिवस राज्यकारभार पाहिल्यानंतर मात्र ते हे पद त्यागतील. 

चार्ल्स यांच्यानंतर कोण असेल राजा? 
प्रिन्सेस डायनाशी (Princes Diana) घटस्फोट, दुसरं लग्न, वाढतं वय आणि इतरही काही मुद्द्यांरून चार्ल्स यांच्यावर जनतेची नारजी असेल. ज्यामुळं ते पद सोडतील. यामध्ये मोठा दावा असा आहे, की त्यांच्यानंतर प्रिन्स विलियम नव्हे, तर धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी (prince harry) वयाच्या 38 व्या वर्षी ब्रिटनचे राजे होतील. 

मारियो रीडिंग यांनी King of the Islands या नॉस्‍त्रेदमस यांच्या कवितेचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये ब्रिटनच्या सत्तेतून अनेक राज्य विभक्त होतील. राजकीय दुफळी माजेल आणि प्रिन्स विलियम (Prince willium) सिंहासनासाठी स्पष्ट नकार देतील. ज्यामुळं ही जबाबदारी प्रिन्स हॅरी यांच्याकडे चालून येईल. नॉस्‍त्रेदमस यांनी हिटलरचा उदय, अंत, 9/11 चा हल्ला या भविष्यवाणीही केल्या होत्या. ज्या तंतोतंत खऱ्या ठरल्या. आता ब्रिटनच्या शाही कुटुंबाविषयी केलेली ही भविष्यवाणी कितपत खरी ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

Read More