Marathi News> विश्व
Advertisement

एक नंबर Video! झपाझप झाडावर चढला भलामोठा अजगर, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले अवाक

अजगराच्या झाडावर चढण्याची ही ट्रीक आहे भन्नाट, पाहाल तर तुम्हीही तोंडात बोटं घालाल

एक नंबर Video! झपाझप झाडावर चढला भलामोठा अजगर, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले अवाक

Python Climbing on tree : जर तुम्हाला जबरदस्त व्हिडीओ पाहायायचे असतील तर सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडीओ मिळतील. तुम्हाला जराशी मेहनत घेऊन असे व्हिडीओ शोधून काढावे लागतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते, म्हणूनच असे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ आमच्याही हाती लागला आहे. खरंतर आपण चार पायांच्या प्राण्यांना सहज झाडावर चढताना पाहतो. मात्र, एका अजगराला तुम्ही झाडावर चढताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? बरं हा हळू हळू झाडावर चढत नाही. झपाझप झाडावर चढणारा अजगर आता प्रचंड व्हायरल  झाला आहे. या व्हिडिओमध्ये एखादा अजगर नेमका पाय नसतानाही कसा झाडावर चढतो हे पाहायला मिळतंय.  

एखाद्या प्राण्यासारखा झाडावर चढणारा अजगर, व्हिडीओ झाला व्हायरल...

या व्हिडिओमध्ये एक अजगर झपाझप झाडावर चढताना पाहायला मिळतो. या व्हिडिओला @animal.angry नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक झाड पाहायला मिळतं. या झाडाच्या चारही बाजूने एक अजगर विळखा घातलेला पाहायला मिळतो. काही क्षणात हा अजगर रहस्यमय पद्धतीने झाडावर चढताना पाहायला मिळतो. असं दृश्य तुम्ही कदाचितच पाहिलं असेल . हा अजगर झाडाच्या वरच्या बाजूला पोहोचताच त्याचा वेगही वाढलेला पाहायला मिळतो. 

नेटकरी म्हणतात, हे काय बघतोय आम्ही

अजगाराचं हे अशा पद्धतीने झाडावर चढणं अत्यंत विलोभनीय असल्याचं पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने हा अजगर आदार चढतोय हे पाहून खरंच तुम्हला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ 3 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. या व्हिडीओखली अनेक कमेंट्स देखील आलेल्या आहेत. हे आम्ही काय पाहतोय, डोळ्यावर विश्वास बसत नाही असं काही दर्शक म्हणतायत. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.  

Read More