Marathi News> विश्व
Advertisement

'या' देशात लॉकडाऊनविरोधात नागरिक रस्त्यावर

जर्मनीतील नागरिकांना याचा त्रास जाणवू लागलाय.

'या' देशात लॉकडाऊनविरोधात नागरिक रस्त्यावर

बर्लिन : जगभरातील बहुसंख्य देश कोरोनाशी लढा देत आहेत. लॉकडाऊन असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. याचे आर्थिक नुकसान देखील देशांना सहन करावं लागतंय. लॉकडाऊन हाच सध्या यावर प्रभावी उपाय मानला जातोय. पण जर्मनीतील नागरिकांना याचा त्रास जाणवू लागलाय. मध्य बर्लिनमध्ये शेकडोजण रस्त्यावर उतरुन लॉकडाऊनला विरोध करु लागले आहेत. 

'आम्हाला आमचं आयुष्य परत पाहीजे', 'संविधानिक अधिकार वाचवा', 'स्वातंत्र्य सर्वकाही नाही पण विना स्वातंत्र्य काहीच नाही' असे फलक त्यांच्या हातात दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिकजणांना ताब्यात घेतले आहे. काही आंदोलकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळले होते. मास्क घालून ते जमिनीवर बसले होते. 

'लोकतांत्रिक प्रतिविरोध'च्या नावे आंदोलनकर्त्यांनी पत्रकं वाटली. कोरोना वायरसचे भीती दाखवून देशाची ताकद संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे यात म्हटले आहे. तसेच जगातील १२७ डॉक्टरांचे मतं यात आहे, ज्यामध्ये ते कठोर लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित करत आहेत. 

वर्तमानपत्र वितरणाची परवानगरी देण्यात आली आहे पण आंदोलनाची कोणतीही परवानगी नसल्याचे पोलीस प्रवक्त थिलो कैबलिट्स यांनी सांगितले. आम्ही कोणतेही आंदोलन मध्ये थांबवू शकू, हे आंदोलन झाले तेव्हा घटनास्थळी १८० पोलीस उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी आध गुलाबाचे फूल देऊन हास्य चेहरा ठेवून शांततामार्गाने आंदोलन केले होते. 

Read More