Marathi News> विश्व
Advertisement

...तर भारतात या! पंतप्रधानांचं दावोसमधून जगाला आवाहन

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना मोदींनी जगभरातल्या व्यावसायिकांना आवाहन केलं आहे.

...तर भारतात या! पंतप्रधानांचं दावोसमधून जगाला आवाहन

दावोस : स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना मोदींनी जगभरातल्या व्यावसायिकांना आवाहन केलं आहे. समृद्धतेसह शांतता हवी असेल तर भारतात या, असं आवहान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. परदेशी गुंतवणूकदारांना भारतात रेड कार्पेट दिलं जात असल्याचं मोदी म्हणाले. तसंच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनपर्यंत जाईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

२१ वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल झाले. १९९७ च्या तुलनेत भारताचा जीडीपी ६ पटींनी वाढला. तसंच ७० वर्षानंतर भारतात जीएसटी लागू झाला. असं म्हणत मोदींनी दावोसमध्येही सबका साथ, सबका विकासचा नारा दिला. भारताच्या रेटिंग्ज आणि रॅकिंगचं जगानं स्वागत केल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली.

जगासमोर तीन सगळ्यात मोठी आव्हानं

जलवायू परिवर्तन, दहशतवाद आणि आत्मकेंद्रीत समाज ही जगासमोरची तीन मोठी आव्हानं असल्याचा धोका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दावोसमध्ये बोलून दाखवला. सोशल मीडिया हे जोडणारं आणि तोडणारंही असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

सोशल मीडिया जोडणारं आणि तोडणारंही

WEF मुळे आर्थिक स्थिती सुधारली

डेटावर ज्याचं वर्चस्व तोच जगाचा राजा

जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगचं आव्हान

१९९७च्या तुलनेत भारताचा जीडीपी ६ पटींनी वाढला

जलवायू परिवर्तन हे पहिलं सगळ्यात मोठं आव्हान

ग्लोबलायजेशनची चमक दिवसेंदिवस कमी होत आहे

दहशतवाद हे दुसरं सगळ्यात मोठं आव्हान

आत्मकेंद्रीत समाज तिसरं मोठं आव्हान

२१ वर्षांमध्ये आर्थिक स्थितीमध्ये बदल

दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सबका साथ, सबका विकासचा नारा

तीन वर्षांमध्ये १४०० पेक्षा नको असलेले कायदे रद्द केले

परदेशी गुंतवणुकीला भारतात मोठी संधी

७० वर्षानंतर भारतात जीएसटी लागू झाला

परदेशी गुंतवणूकदारांना भारतात रेड कार्पेट

२०२५पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची

भारताच्या रेटिंग्स, रॅकिंगचे जगाकडून स्वागत

भारत शेजारच्या देशांना नेहमीच मदत करत आलाय

भारत नैसर्गिक संपत्तीचं कधीच शोषण करत नाही

युएनच्या शांतीसेनेत भारताचं मोठं योगदान

समृद्धतेसह शांतता हवी असेल तर भारतात या

Read More