Marathi News> विश्व
Advertisement

हवाईसुंदरी पोषाख खटकतो, सरकारकडे तक्रार

विमानातून प्रवास करताना एका महिलेला हवाईसुंदरीचा पोषाख भलताच खटकला. त्यामुळे या महिलेने चक्क सरकारकडेच तक्रार केली आहे.

हवाईसुंदरी पोषाख खटकतो, सरकारकडे तक्रार

नवी दिल्ली: कोणाला कोणत्या ठिकाणी आणि कशावर आक्षेप येईल हे खरेच सांगता येत नाही. प्रकरण आहे एअर एशियाशी संबंधीत. विमानातून प्रवास करताना एका महिलेला हवाईसुंदरीचा पोषाख भलताच खटकला. त्यामुळे या महिलेने चक्क सरकारकडेच तक्रार केली आहे.

'एअर होस्टेजचा पोषाख भलताच तंग असतो'

सरकारकडे केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, हवाईसुंदरीचा पोषाख भलताच तंग असतो. इतका की, त्या पोषाखातून तिची वक्षस्थळं तर दिसतातच पण, अंतर्वस्त्रेही सहज दिसतात. हवाईसुंदरी अशा पद्धतीचे कपडे घालतात. त्यामुळे मलेशियाची नाहक बदनामी होत आहे. डॉ. जून रॉबर्टसन असे या महिलेचे नाव असून ती न्यूजीलंडची राहणारी आहे.

तंग आणि तोकडे कपडे पाहून अत्यंत वाईट वाटले

मलेशियाच्या सरकारला लिहीलेल्या पत्रात ही महिला पुढे म्हणते, मला या मुलींच्या वर्तनापेक्षा तंग आणि तोकडे कपडे पाहून अत्यंत वाईट वाटले. माझ्या सोबत असलेल्या इतर सहप्रवाशांनाही मुळीच हा प्रकार आवडला नाही. क्वलालंपूर एक हवाईसुंदरी खाली वाकली असता त्यातून तिची अंतरवस्त्रेही प्रवाशांना दिसली. हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आहे.

पुरूष कर्मचाऱ्यांबाबत काहीच आक्षेप नाही

पुढे याच तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही विमानात होतो तेव्हा, एहवाईसुंदरीने आपल्या ब्लाऊजचा वरचा भाग उघडाच ठेवला होता. ज्यामुले तिच्या वक्षस्थळांचा एक भाग दिसत होता. अगदीच असहय्य झाल्याने तिला आपले जाकेट बंद करण्यास सांगणे मला भाग पडले.

fallbacks

दरम्यान, या महिलेला पुरूष कर्मचाऱ्यांबाबत काहीच आक्षेप नाही. ते सर्व योग्य पोषाकात आणि अगदीच सभ्यपने वावरत होते. दरम्यान, एअर एशियाने मात्र या तक्रारीवर कोणतीही प्रतिक्रीया अद्याप दिली नाही. पण, हवाईसुंदरीच्या कपड्यावरून वाद निर्माण झालेले हे दुसरे प्रकरण असल्याची चर्चा आहे.

Read More