Marathi News> विश्व
Advertisement

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांना 10 तर मुलीला 7 वर्षाची शिक्षा

शरीफ आणि मुलगी मरियमला कारावासाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांना 10 तर मुलीला 7 वर्षाची शिक्षा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टचाराच्या आरोपाखाली 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच त्यांची मुलगी मरियम हिला देखील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवाज शरीफ यांच्या जावयाला 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता मरियम निवडणूक नाही लढवू शकणार.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना लंडनमध्ये 4 फ्लॅटच्या प्रकरणात ही शिक्षा झाली आहे. नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी सध्या लंडनमध्ये आहेत. पाकिस्तानच्या कोर्टाने  नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना शिक्षा सुनावली आहे.

याआधी शुक्रवारी 7 दिवसासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. नवाज, मरियम आणि सफदर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. लंडनमध्ये अवैध पद्धतीने संपत्ती जमवल्याने ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Read More