Marathi News> विश्व
Advertisement

चॅनलवर बुलेटिन सुरू असताना ऑन एअर भिडले अॅंकर, व्हिडिओ व्हायरल

 हा वाद इतका टोकाचा होता की दोघे ओन एअरच भिडले आणि दोघांमध्ये जोरदार शब्दिक वाद झाले. ज्यामुळे बुलेटीनचा तर, विचका झालाच. पण, चॅनलची आब्रुही वेशीवर टांगली गेली ती वेगळीच. 

चॅनलवर बुलेटिन सुरू असताना ऑन एअर भिडले अॅंकर, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: टीव्ही चॅनलवर चालणाऱ्या खडाजंगी चर्चा आपण नेहमीच पाहतो. या चर्चेच्या विषयाचा आषय कायम ठेवणे आणि तोसतत प्रवाही ठेवणे हे अॅंकरचे प्रमुख काम. पण, जेव्हा दोन अॅंकर चर्चा सुरू असतानाच जेव्हा एकमेकांवर व्यक्तिगतरित्या आरोप करत भांडतात तेव्हा हे चित्र अगदीच भयानक दिसते. पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनलवर हे चित्र दिसले. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) भलताच व्हायरल होत आहे.

खरं म्हणजे, न्यूज चॅनलच्या न्यूजरूममधून दोन अॅंकर जेव्हा बुलेटीन करत असतात. तेव्हा त्यांच्यात जर योग्य ताळमेळ असेल तर, तो शो उच्च पातळीला पोहोचतो. भारतासह जगभरातील अनेक नामवंत न्यूज चॅनलनी अशा प्राकारचे शो केलेले आहेत. आजही दाखवतात. पण, पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलवर जे घडले ते भलतेच.

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी न्यूज चॅनल डेली पाकिस्तानवर हा प्रकार घडला. या चॅनलचे एक पुरूष आणि एक महिला असे दोन अॅंकर एक बुलेटीन करत होते. दरम्यान, न्यूज वाचण्यावरून दोघांवर ऑनएअरच वाद झाला. हा वाद इतका टोकाचा होता की दोघे ओन एअरच भिडले आणि दोघांमध्ये जोरदार शब्दिक वाद झाले. ज्यामुळे बुलेटीनचा तर, विचका झालाच. पण, चॅनलची आब्रुही वेशीवर टांगली गेली ती वेगळीच. 

Read More