Marathi News> विश्व
Advertisement

85 कोटींना 1 लीटर विष! घरातील 'हा' छोटासा जीव पालटू शकतो एखाद्याचं नशीब

Venom Price Worth Crores: अनेकदा विष म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे साप. मात्र सापापेक्षाही लहान आकाराचा एक जीव विषासंदर्भात अधिक घातक आणि तितकाच मौल्यवान आहे.

85 कोटींना 1 लीटर विष! घरातील 'हा' छोटासा जीव पालटू शकतो एखाद्याचं नशीब

Venom Price Worth Crores: 'रिस्क है तो इश्क है' हा संवाद तुम्ही नक्कीच ऐकला असेल. अनेकदा धोका पत्कारल्याशिवाय नफा होत नाही असं म्हटलं जातं. हेच या संवादामधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तुमचा या वाक्यावर विश्वास बसत नसेल तर आज आपण अशा एका जीवाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला पाहताच अनेकजण सैरावैरा पळू लागता. मात्र थोडीशी हिंमत केली तर घर बसल्या एखादी व्यक्ती 85 कोटी रुपये कमवू शकता.

कोट्यवधींची कमाई होऊ शकते

विषारी प्राण्यांबद्दल चर्चा सुरु झाली की सर्वात आधी डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे साप. आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात साप पाहिला असेल किंवा सार्पदंशांच्या बातम्या वाचल्या असतील. सापाचं विष एवढं घातक असतं की त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. सापचं विष फार महाग असतं. मात्र हे विष काढणं तितकेच अवघड असते आणि हे काम फक्त प्रोफेश्नल व्यक्ती करु शकतात. मात्र आज आपण या ठिकाणी सापापेक्षाही लहान आकाराच्या जीवाबद्दल जाणून घेणार आहोत. या जीवाचं विष तुम्हाला कोट्यधीश बनवू शकतं. ज्या विषापासून वाचण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करतो. हेच विष कोट्यावधी रुपये कमवून देऊ शकतं.

एवढी किंमत असलेलं विष नेमकं कोणाकडे?

आता एवढ्या वेळ नावाचा उल्लेख न करता ज्या जीवाबद्दल आपण बोलत होतो तो जीव फार दुर्मिळ नाही. म्हणजे हा प्राणी अमुक एका देशात सापडतो किंवा जंगलात सापडतो अशातला भाग नसून तो तुमच्या घराच्या आजूबाजूलाही आढळून येऊ शकतो. अनेकदा त्याने केलेला एक दंश जीव घेण्यास पुरेसा असतो. आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो जीव म्हणजे विंचू! विंचवाच्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 1 कोटी डॉलर्सहून अधिक आहे. विंचवाच्या एक लीटर विषाची किंमत 1 कोटी 3 लाख 2700 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही किंमत 85 कोटींहूनही अधिक होते. भारतात विंचवाच्या विषाची किमान सरासरी किंमत 7 लाख रुपये इतकी आहे.

कुठे वापरलं जातं हे विष?

सामान्यपणे एका विंचवाच्या दंशामधून 2 मिलीलीटर विष मिळतं. म्हणजेच एका विंचवाचं विषही एखाद्याला लखपती करु शकतं. मात्र एवढं मौल्यवान असलेलं विंचवाचं विष कशासाठी वापरतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर विंचवाचं विष हे अॅण्टी व्हेनम म्हणजेच ऑस्टिथोअर्थराइटिस, इरीटेबल बोवल सिंड्रोम आणि माइएस्थिनिया ग्रेव्हिससारख्या दुर्धर आजारांवरील इलाज करण्यासाठी वापरलं जातं. विंचवाचं विष पावडर फॉर्ममध्ये कनव्हर्ट करुन विकलं जातं. मात्र विंचू पकडणं हे सामान्य व्यक्तींचं काम नाही. त्यामुळेच नसते धाडस करुन विंचू पकडण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. विंचवाच्या विषाचा एक थेंबही अनेकांचे प्राण घेण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो.

Read More