Marathi News> विश्व
Advertisement

'भीती कशाची, पर्वा बी कुनाची....'; घर वाचवणाऱ्या हट्टी आजीबाईंपुढे बिल्डरही नमला

या आजींकडून खूप काही शिकण्यासारखं... 

'भीती कशाची, पर्वा बी कुनाची....'; घर वाचवणाऱ्या हट्टी आजीबाईंपुढे बिल्डरही नमला

वॉशिंगटन: स्वत:च्या कष्टाच्या पैशातून उभं केलेलं, सजवलेलं आणि जीवंतच केलेलं घर प्रत्येकाच्या मनाच्या जवळचं असतं. घर म्हटलं की त्यात फक्त माती, विटांच्या भींतीच नसतात. तर या घरात भावनांचा ओलावाही मुरलेला असतो. अशाच एका घरानं सध्या साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. 

लक्ष या कारणासाठी वेधलं जात आहे की एका महिलेनं इतका हट्ट केला, ती बिल्डरशी इतकी लढली की शेवटी त्याला घराच्या बाजूनं मॉल उभा करावा लागला. 

मॉल उभारण्यासाठी हा बिल्डर महिलेकडून तिच्या घराची जमीन खरेदी करु इच्छित होता. यासाठी त्यानं 7 कोटी रुपयांची ऑफरही दिली होती, पण, महिलेनं हा प्रस्ताव नाकारला. 

नव्या शॉपिंग मॉलसाठी बिल्डरनं इतर घरांची खरेदी केली होती. पण, या आजी ऐकेना. सुरुवातीला महिलेला जमिनीसाठी 750,000 डॉलर (5,73,16,875 रुपये) इतकी ऑफर दिली गेली. यानंतर 84 वर्षीय एडिथ मेसफील्ड (Edith Macefield) या आजींना या रकमेत आणखीही वाढ दिली गेली. 

पण, त्यांनी घर विकण्यास स्पष्ट नकार दिला. सरतेशेवटी शरणागती पत्करत बिल्डरनं मॉल उभारला. पण, आजही त्याच्या बरोबर मध्यभागी या महिलेचं खर रुबाबात उभं आहे. 

का महत्त्वाचं आहे हे घर ? 
एडिथ मेसफील्ड (Edith Macefield) यांनी 1952 मध्ये ही जमीन 3,750 डॉलर (2,86,637 रुपये) ना खरेदी केली होती. यानंतर एडिथ यांची त्या व्यक्तीशी मैत्री झाली. जो 2006 मध्ये मॉलच्या निर्मीतीसाठीचा कंस्ट्रक्टर मॅनेजर होता. 

महिला आणि बेरी मार्टीन यांचं नातं इतकं घट्ट होतं की, 2008 मध्ये जेव्हा एडिथ यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी मार्टिनसाठी हे घर सोडलं. पण मार्टिन बेरोजगार असतेवेळी त्यांनी हे घर विकलं. 

Read More