Marathi News> विश्व
Advertisement

Video: अशी ही आलिशान कार! बसायला जागा नसताना चालकाने रस्त्यावर चालवली

सामान्य कारपासून लक्झरी कारपर्यंत प्रत्येकाने रस्त्यांवर धावताना पाहिले असेल. कारचालक सहसा ड्रायव्हरच्या सीटवर बसून कार चालवतात. पण...

Video: अशी ही आलिशान कार! बसायला जागा नसताना चालकाने रस्त्यावर चालवली

मुंबई : little luxury car : सामान्य कारपासून लक्झरी कारपर्यंत प्रत्येकाने रस्त्यांवर धावताना पाहिले असेल. कारचालक सहसा ड्रायव्हरच्या सीटवर बसून कार चालवतात. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक अजब गोष्ट दिसून आली. कार इतकी लहान आहे की, त्या गाडीत बसायला जागाच नाही. या कारमध्ये कोणतीही व्यक्ती बसू शकत नाही, तरीही त्या व्यक्तीने असा पराक्रम केला आहे की तो पाहिल्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. हे खरं आहे, लोकांना ट्विटरवर हा व्हिडिओ खूप आवडला. (Nice little luxury car viral video)

छोट्या लक्झरी कारने सर्वांना केलं हैरान 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बाग परिसरातून एक छोटी केशरी रंगाची कार रस्त्यावर जाताना दिसत आहे. ते पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की कदाचित ही रिमोट कंट्रोल कार आहे, पण गाडी रस्त्यावर उभी करताच काही अजब गोष्ट दिसते. ड्रायव्हरच्या सीटवर कोणीही बसलेले दिसत नाही. अचानक एक माणूस त्या कारमधून बाहेर येताना दिसतो.

बसायला जागा नसताना चालकाने कार चालवली 

लोकांना आश्चर्य आहे की, एखादी व्यक्ती आत जाऊन छोटी गाडी कशी चालवू शकतो, ज्यामध्ये बसायला जागा नाही. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. बेस्ट व्हिडिओने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. साडेपाच हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'खूप छान छोटी कार ...' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले, 'हे काय आहे ... हा एक धक्कादायक व्हिडिओ आहे.' 

Read More