Marathi News> विश्व
Advertisement

जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'

Abraham Lincoln Was Gay Claims New Documentary: गुलामगिरीविरुद्ध लढणारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अशी ओळख असलेल्या लिंकन यांच्याबद्दलचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने एक डॉक्युमेंट्री सध्या चांगलीच चर्चेत आहे.  

जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'

Abraham Lincoln Was Gay Claims New Documentary: जगभरामध्ये सध्या 'लव्हर ऑफ मेन: द अनटोल्ड हिस्ट्री ऑफ अब्राहम लिंकन' ही डॉक्युमेंट्री चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या अब्राहम लिंकन हे समलैंगिक होते असा खळबळजनक दावा या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये अब्राहम लिंकन यांचे पुरुषाबरोबर प्रेमसंबंध होते असा दावा करण्यात आला आहे. ही डॉक्युमेंट्री शॉन पिटरसन यांनी दिग्दर्शित केली आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये अब्राहम लिंकन यांनी केलेल्या अभ्यासाबरोबर त्यांच्या आयुष्याशी संबंधित यापूर्वी कधीही न पाहिलेले फोटोही पहिल्यांदाच जगासमोर आणले आहेत.

पुरुषांबरोबर प्रेमसंबंध

अब्राहम लिंकन यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या या डॉक्युमेंट्रीच्या प्रोमोशनल व्हिडीओमध्ये, "लिंकन यांच्यासंदर्भात अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती, यापूर्वी कधीही न पाहिलेले लिंकन यांचे फोटो, पत्रांबरोबरच यामध्ये पुरुषांबरोबर असलेल्या लिंकन यांच्या प्रेमसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे," असं म्हटलं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये मानवी लैंगिकतेसंदर्भातील इतिहासाचा वेध घेण्याबरोबरच 19 व्या शतकातील लैंगिक भावनांना समकालीन विरोधही अधिरेखित करतो. अमेरिकेच्या इतिसाहामधील आतापर्यंत गायब असलेल्या भागावर ही डॉक्युमेंट्री प्रकाश टाकते. प्रेक्षकांनी मानवी लैंगिक भावनांच्या माध्यमातून या इतिहासाकडे पहावे असं डॉक्युमेंट्रीमधून सुचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

महिलांपेक्षा अधिक संख्येनं पुरुषांबरोबर संबंध होते असं दावा

डॉक्युमेंट्रीच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये एक तज्ज्ञ, "लिंकन यांनी महिलांपेक्षा पुरुषांबरोबर अधिक संख्येनं शय्या केली आहे. त्यांचे जितक्या महिलांबरोबर संबंध होते त्यापेक्षा अधिक संख्येनं पुरुष त्यांचे जोडीदार राहिले आहेत," असं म्हणाता दिसतो. या डॉक्युमेंट्रीमध्ये इतिहासतज्ज्ञांच्या मुलाखती, तसेच अनेक मानवंत शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञांच्या मुलाखतींचा समावेश आहे. यामध्ये हॉवर्ड्स, कोलंबिया, ब्राऊन, विल्से, रुटगर्स यासारख्या विद्यापिठांचा समावेश आहे. लिंकन यांच्या जीवनावरील ही डॉक्युमेंट्री नेमकी कधी प्रदर्शित होणार हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. 

आयुष्यभर गुलामगिरीविरुद्ध लढले

लिंकन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला होता. ते रिपब्लिकन पक्षाचे अमेरेकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्षपद भूषवलं होतं. लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. त्यामुळेच त्यांना 'गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष' म्हणूनही ओळखलं जातं. अमेरिकेतील गृहयुद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेतील काही गुलामगिरी समर्थकांनी कट रचून त्यांची हत्या केली. 15 एप्रिल 1865 या दिवशी सकाळी अब्राहम लिंकन एका लॉजमधील खोलीत मृतावस्थेत आढळले.  जॉन विल्किक्स बूथ या माणसाने लिंकनवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

Read More