Marathi News> विश्व
Advertisement

Isral Palestine War: वेब सीरिज Fauda मधील क्रू मेंबरने देशासाठी दिला जीव, गाझाविरोधातील युद्धात ठार

फौदा ही एक इस्रायली टीव्ही मालिका आहे. इस्रायलमधील लष्कर दलातील माजी सैनिक लियोर रज आणि एवी इश्कारोफ यांनी ही मालिका तयार केली आहे. या सीरिजमध्ये काम करणारे अनेक अभिनेते हमासविरोधातील युद्धात उतरले आहेत.   

Isral Palestine War: वेब सीरिज Fauda मधील क्रू मेंबरने देशासाठी दिला जीव, गाझाविरोधातील युद्धात ठार

इस्रायली नेटफ्लिक्स वेब सीरिज 'फौदा'मधील प्रोडक्शन क्रूच्या एका सदस्याचा गाझाविरोधात युद्ध लढताना मृत्यू झाला आहे. फौदा सीरिजच्या एक्सवरील अकाऊंटवर यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 'टीम फौदा'ने एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आम्हाला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, "आमच्या फौदा कुटुंबातील सदस्यांपैकी एक मातन गीरचा गाझाविरोधातील युद्धात लढताना मृत्यू झाला'.

मातन हे फौदाच्या क्रूमधील एक महत्त्वाचे सदस्य होते. टीम फौदाने एक्सवर लिहिलं आहे की, "फौदाचे सर्व अभिनेते आणि क्रू मेंबर या नुकसानामुळे दु:खी आहेत. आम्ही मातनचं कुटुंब आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ". मातने हे त्या पाच इस्रायली सैनिकांपैकी एक होते, ज्यांचं शुक्रवारी उत्तर गाझात हमासविरोधातील लढाईत निधन झालं. 

फौदा ही एक इस्रायली टीव्ही मालिका आहे. इस्रायलमधील लष्कर दलातील माजी सैनिक लियोर रज आणि एवी इश्कारोफ यांनी ही मालिका तयार केली आहे. डिसेंबर 2016 मध्ये ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली होती. ही इस्रायलमधील प्रसिद्ध वेब सीरिजपैकी एक आहे. ही वेब सीरिज अरबी आणि हिब्रूमध्ये शूट करण्यात आली. नेटफ्लिक्सवर ही इंग्लिश सब-टायटल्ससह उपलब्ध आहे.

'फौदा' मध्ये पॅलेस्टाईन आणि गाझामध्ये इस्रायली संरक्षण दल आणि गुप्तचर संस्था त्यांच्या शत्रूंचा कसा सामना करतात हे दाखवण्यात आले आहे. यापूर्वी, आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये फौदा वेब सीरिजमध्ये डोरॉनची भूमिका साकारणारा दिग्दर्शक आणि अभिनेता लिओर राझ हमासच्या रॉकेट हल्ल्यातून इस्त्रायलींना वाचवताना दिसला होता. लिओरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या एक्स हँडलवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये तो एका भिंतीच्या मागे लपून लोकांना वाचवताना दिसत होता, तर पलीकडून आकाशात रॉकेट डागले जात होते.

Read More